राहत्या घरातून शस्ञ परवानाधारक रिव्हॉल्व्हरसह सात जीवंत राऊंड लंपास

आर्णी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
theft
theft Sakal

आर्णी : शस्ञ परवानाधारक असणारी रिव्हॉल्व्हरसह सात राऊंड लंपास झाल्याची घटना ता, 21 जानेवारीला सकाळी साडे पाच ते साडे सहा दरम्यान आर्णीतील मूबारक नगरातील राहत्या घरात घडली असून आर्णी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Vidarbh Crime News)

प्रभू केशवराव गव्हाणकर (वय 68) रा.मुबारक नगर ता.आर्णी हे नेहमी प्रमाणे रात्री दरम्यान त्यांची रिव्हॉल्व्हर व सात राऊंड लाकडी दिवानच्या उशी खाली ठेऊन झोपले व ता,21जानेवारीला सकाळी 5/30 वा दरम्यान घरा बाहेर घराला कुलूप लावून फीरण्यासाठी गेले व परत आल्यावर त्यांनी दरवाजा उघडले व दुसऱ्या दरवाजा जवळ आले तेव्हा समजले की दुसरा दरवाजा नजर चुकीने उघडा राहिला आहे.

theft
८९ टक्के पुणेकर भाड्याच्या घरात; मालकीच्या घरात जाण्याची भावना

त्या वेळी दिवानचे खाली ठेवलेला रिव्हॉल्व्हर व राऊंड बघितले असता ती रिव्हॉल्वर दिसली नाही रिव्हॉल्वर व त्या मध्ये असलेले सात राऊंड किंमत अंदाजे 54000 रूपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असल्याची फिर्याद प्रभू केशवराव गव्हाणकर (वय 68)रा. मुबारक नगर ता. आर्णी जि. यवतमाळ यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिल्यावरुन अज्ञात चोरटया विरुध्द गून्हा नोंद केला असुन पूढील तपास ठाणेदार पिताबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कीशोर खंदार,जमादार योगेश सूकलवार, करित आहे

प्रभू गव्हाणकर हे 16 वर्ष सैन्यात तर 21वर्ष पूणे येरवडा जेल येथे सूभेदार म्हणून सेवानियूक्त झाल्यावर सन 2011 पासून आर्णीतील मूबारक नगर येथे वास्तव्यात असून स्वताच्या आत्मसंरक्षणा करिता शस्ञ परवाधारक असणारी रिव्हॉल्व्हरसह सात राऊंड होते,ता,21जानेवारीला सकाळी साडे पांच ते साडे सहा वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयानी घरात ठेवलेली रिव्हॉल्व्हरसह सात राऊंड लंपास केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com