आमदारांसमोर एसटी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर 

श्रीधर ढगे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सध्या राज्यात परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदालन सुरु केले आहे. परिवहन मंडळाच्या गाडयांची अवस्था अत्यंत खराब आहेत. परिवहन विभागाने वायफायसाठी 100 कोटी खर्च केले आहेत.

खामगांव : खामगांव मतदार संघाचे आमदार ऍड. आकाशदादा फुंडकर यांनी आज खामगांव बसस्थानक येथे जाऊन राज्य परिवहन मंडळाच्या सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान यावेळी आ. ऍड फुंडकर यांच्या समोर एसटी कर्मचाऱ्यांचे अश्रू अनावर झाल्याचा प्रसंग घडला.

सध्या राज्यात परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदालन सुरु केले आहे. परिवहन मंडळाच्या गाडयांची अवस्था अत्यंत खराब आहेत. परिवहन विभागाने वायफायसाठी 100 कोटी खर्च केले आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव संपावर जावे लागत आहे. त्यांच्या परिस्थितीचा मला जाणीव असून त्यांच्या या संपाला माझा पाठींबा आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रेटून धरणार आहे. तसेच येत्या ‍हिवाळी अधिवेशनात देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत प्रश्न मांडणार आहे.