बीटी कॉटन मधील शेंदऱ्या बोंड अळीमुळे शेतकरी हवालदिल

cotton-crop
cotton-crop

नांदुरा (बुलडाणा) - कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी आलेल्या बीटी कपाशीवरील शेंदऱ्या बोड अळीने घायाळ केले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात त्यामुळे घट निर्माण झाली आहे.सध्याही अनेक शेतकऱ्यांनी फरदडीचे पीक घेण्यावर जोर दिला असला तरी या पिकावरही मोठ्या प्रमाणात या अळीचे आक्रमण झाले असले तरी कोणतेही कीटकनाशक यावर प्रभावी ठरले नसल्याने येथील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. कृषी विभागाकडून याबाबतची पाहणी सध्या केली जात आहे.व शेतकऱ्यांना ७/१२,आठ-अ सह पेरेपत्रक व कृषी केंद्राची बियाणे घेतल्याची पावती कृषी सहाय्यक यांचेकडे जमा करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कपाशी आहे.या तालुक्यातील शेतकरी कपाशीचे दरवर्षी विक्रमी उत्पादन घेत असल्याने व हा पट्टा दर्जेदार कपाशीसाठी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असल्याने या तालुक्याला कॉटन बेल्टची किनार लाभली आहे.त्यामुळे सर्व बियाणे व कीटकनाशक कंपन्यांची सर्वप्रथम नजर या भागावर दरवर्षी लागून असते.सर्वप्रथम बीटी बियाणे भारतात दाखल झाले त्यावेळेस बी जी 1 च्या तंत्रज्ञानातून हिरवी बोंड अळीचा नायनाट व्हावा यासाठी त्यात तशाप्रकारचे जीन वापरून या अळीला नियंत्रणात ठेवण्याचे पर्यंत केले गेले.त्याला सुरवातीला तसे यशही आले.परंतु कालांतराने हळूहळू हे जिनही संपुष्टात आल्याने व कपाशीच्या पिकावर इतर अळीचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने बाजारात बीजी2 चे बियाणे उपलब्ध झाले.हे बियाणे सर्व अळीना नियंत्रणात ठेवेल अशी हमीही बीटी बियाणे कम्पनींनी शासनास दिली.व सुरवातीपासूनच पर्यावरण पूरक व मित्रकीटक संपुष्टात येऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विना बीटी बियाणे पाकिटासोबत देऊन हे बियाणे शेतकऱ्यांनी शेताच्या चोहोबाजुंनी लावण्याची शिफारससुद्धा केली मात्र याकडे शेतकऱ्यांचे या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचे कारण समोर करून इतर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचा जावईशोध सध्या कम्पन्या लावत असून यातून काढता पाय घेत आहेत.

मागील वर्षी कमी तर या वर्षी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर शेंदऱ्या बोंड अळीचे संपूर्ण भागातच आक्रमण झाले असून शेतकरी वर्गाचे यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.अगोदरच यावर्षी कुठे ओला तर कुठे कोरडा दुष्काळाने शेतकरी घायल आहे.निसर्गाचे दुष्टचक्रात पहिलेच शेतकरी वर्ग अडकलेला आहे.त्यातच कोणत्याच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने व या वर्षी तर सर्वच पिकाच्या दराने नीचांकी गाठली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यात ह्या शेंदऱ्या बोंड अळीने कपाशी पीकही नेस्तनाबूत केल्याने शेतकरी वर्ग पार खचला आहे.यासाठी शासनाने त्यांना मदत देऊन हातभार लावण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

"जीन वापरण्याच्या तांत्रिक अडचणीत सापडणाऱ्या अनेक कंपन्यांना बॅन लागण्याची शक्यता.तशी कृषी विभागाकरून पडताडणी सुरू असून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचीही शासनाची मानसिकता.शासनही शेतकऱ्यांना मदत करणार."

"नांदुरा तालुका हा कॉटन बेल्ट मध्ये मोडतो.येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे कपाशी आहे.या वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात शेंदऱ्या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.जवळजवळ सर्वच बियाणे कंपनीच्या वाणात कमी अधिक प्रमाणात शेंदरी बोंडअळी दिसून आली आहे.ही अळी कपाशीच्या बोंडावस्थेत मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने कापसाची प्रत खराब झाली आहे व उत्पादनातही यात घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.आम्ही आमच्या स्तरावरून कपाशी पिकाची पाहणी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार आहोत.शेतकऱ्यांनीही आवश्यक कागदपत्रे कृषी विभागाकडे सादर करून आपली हरकत नोंदवावी."
- पी.ई.अंगाईत, तालुका कृषी अधिकारी. नांदुरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com