दाभडी जलस्रोत पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा: डॉ. मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मराठवाड्यातील संस्थेकडून दाभडीच्या कामाची दखल
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणलेल्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमामुळे दाभडी प्रसिद्धीस आले होते; तर काँग्रेस पक्षानेही ’चाय की चर्चा’ कार्यक्रम दाभडीतच केला.

यवतमाळ - तनिष्कांनी राबविलेला दाभडी नाला जलस्रोत बळकटीकरण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल. पडीक राहणार्‍या जमिनी वहितीखालील येतील, सिंचन वाढेल आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य राहणार नाही, असे मत माजी खासदार, तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

हिंगोली येथील महावीर भवन मोंढा मैदानात (ता. 24) समता समाजभूषण पुरस्कारांचे वितरण झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महानुभवांचा सन्मान करण्यात आला. विदर्भातील एकमेव महिला इंजिनिअर व तनिष्का सदस्य प्रज्ञा नरवाडे यांचाही या कार्यक्रमात डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उमरखेड येथील पत्रकार अविनाश खंदारे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. कल्याणी एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटी, नांदेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेस कौन्सिल महाराष्ट्रद्वारे या समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. तर माजी सिनेट सदस्य प्रा. कैलास राठोड उद्घाटक होते.

कार्यक्रमाला अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, माजी आमदार भीमराव केराम,  प्रा. सुधीर अनवले, फारुख अहेमद, प्रदीप राठोड, एस. जी. माचनवार आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अ‍ॅड. रमेश धाबे स्वागताध्यक्ष होते. तर निमंत्रण म्हणून प्रा. गणेश हटकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा तनिष्का समन्वयक राधिका आव्हाड उपस्थित होत्या.
 
मराठवाड्यातील संस्थेकडून दाभडीच्या कामाची दखल
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणलेल्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमामुळे दाभडी प्रसिद्धीस आले होते; तर काँग्रेस पक्षानेही ’चाय की चर्चा’ कार्यक्रम दाभडीतच केला. आता हे गाव एका सकारात्मक कारणासाठी गाजते आहे. सकाळ रिलीफ फंड व ’सकाळ’च्या तनिष्का सदस्यांनी या गावातील नऊ किलोमीटर महादेव नाल्याचे जलस्रोत बळकटीकरणाचे काम लोकसहभागातून पूर्ण केले आहे. या कामाची चर्चा महाराष्ट्रभर होते आहे. तनिष्का सदस्य व स्थापत्य अभियंता म्हणून प्रज्ञा नरवाडे यांनी तांत्रिक मार्गदर्शक म्हणून या कामाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी दाभडी येथील तनिष्कांना प्रेरित केले. या कामामुळे नाल्याच्या काठावरील पडीक राहणारी हजारो एकर जमीन वहितीखाली आली. गावातील जलपातळी वाढली. बारमाही सिंचनाची सुविधा शेतकर्‍यांना उपलब्ध झाली. या कामाची दखल मराठवाड्यातील कल्याणी एज्युकेशन संस्थेचे व नांदेड येथील राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. कैलास राठोड यांनी घेतली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​