श्रींच्या स्वागतासाठी एक लाख भाविक शेगावात

श्रीधर ढगे पाटील
रविवार, 30 जुलै 2017

आषाढी एकादशीला विठुरायाची भेट झाल्यानंतर श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला.  आज सकाऴी पुंडलिक वरदे, हरिविठ्ठलाचा गजर करीत हजारो वारकरी खामगावातून पालखीच्या सोबत शेगावकडे निघाले.शेगाव खामगाव रस्यावर भगव्या पताका व गणगण गणात बोतेच्या आवाजाने पंढरीच अवतरल्याचे चित्र ऩिर्माण झाले.

शेगाव : माझ्या जिवाची आवडी ।
पंढरपुरी नेऊनि गुढी ।।
गजर विठुचा करोनि दारोदारी,
गजानन माऊली परतुनी आली ।

या ओऴीनुसार तब्बल 52 दिवस ज्ञानोबा-तुकोबाचा गजर व मुखी गण गण गणात बोतेचे नामस्मरण करीत हजारो वारकर्यासह  श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज ता.30  सकाळी 10 वाजता संतनगरीत आगमन झाले. यावेळी जय गजानन या जयघोषाने अवघी शेगावनगरी दुमदुमली होती.

आषाढी एकादशीला विठुरायाची भेट झाल्यानंतर श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला.  आज सकाऴी पुंडलिक वरदे, हरिविठ्ठलाचा गजर करीत हजारो वारकरी खामगावातून पालखीच्या सोबत शेगावकडे निघाले.शेगाव खामगाव रस्यावर भगव्या पताका व गणगण गणात बोतेच्या आवाजाने पंढरीच अवतरल्याचे चित्र ऩिर्माण झाले. पालखी संत गजानन महाराज कॉलेज जवऴ आल्यानंतर  शिवशंकरभाऊ पाटील यांनी पालखीचे स्वॉगत केले.दूपारी 1 वाजता कॉलेज मधुन गजानन वाटीका मार्गे पालखी मंदीराकडे रवाना झाली. विविध मंडऴांच्या वतीने भाविकांना अल्पोपहार व चहापानाचे वाटप करण्यात आले

दरम्यान, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पालखी रेल्वे स्टेशन शिवाजी चौक शिवाजी चौक मार्गे  मंदिरात गेली तेथे महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.                        

श्रींच्या पालखीपूढे सरस्वती म्यूझीकल ब्रॅडचे पथक, शाऴकरी विद्यार्थी,  संत गजानन महाराजांची पालखी विविध फुलांनी सजविण्यात आली होता.आज सकाऴपासूनच आळंदी ग्रामस्थ, परिसरातील गावातील नागरिक, वारकरी, भाविक श्रींच्या स्वागतासाठी शेगाव येथे दाखल झाले होते.

माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर व ज्ञानोबा-माऊली-तुकारामच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. अलंकापुरीतील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. चौकाचौकात पालखीचे स्वागत करण्यात येत होते. विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्यातर्फे केळीवाटप व फराळवाटप करण्यात आले.