विदर्भातील 87 हॉटेल्समध्ये वीजचोरी उघड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नागपूर - महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारितील दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागातर्फे संपूर्ण विदर्भातील हॉटेल्स आणि ढाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. एकूण 209 ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत 87 ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली. यासर्व ठिकाणी एकूण 65 लाख 85 हजार मूल्याच्या वीजचोऱ्या आणि वीज वापरातील अनियमितता उघडकीस आली. 

प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागातर्फे 10 ते 15 जुलैदरम्यान विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये हॉटेल्स आणि ढाब्यांवरील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. अकोला मंडळात 13, बुलडाणा 7, वाशीम 5, यवतमाळ 2, अमरावती 10, नागपूर शहर मंडलात 8, भंडारा 7, वर्धा 6, चंद्रपूर 17, गोंदिया 11 आणि गडचिरोली मंडळातील 1 अशा एकूण 87 ठिकाणी विजेचा गैरवापर आढळून आला. 

अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर राजरोसपणे विजेचा गैरवापर आणि अनधिकृत वापर होत असल्याचे ऐकीवात असल्याने त्यांचेवर सर्वत्र एकाचवेळी कारवाई करण्याच्या निर्णय दक्षता, सुरक्षा व अंमलबजावणी प्रादेशिक उपसंचालकांनी घेत विदर्भातील 12 मंडळातील भरारी पथकांना कारवाईचे निर्देश देण्यात आले. तपासणीत 87 पैकी 52 प्रकरणांत भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये थेट वीजचोरी तर 5 ठिकाणी कलम 126 अन्वये विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळले. याशिवाय 37 ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आली. 

मंडळनिहाय कारवाई 
मंडळ तपासलेल्या प्रतिष्ठानांची संख्या अनियमितता संख्येत 
अकोला 22 13 
बुलडाणा 16 07 
वाशीम 7 05 
यवतमाळ 7 02 
अमरावती 15 10 
नागपूर शहर 25 08 
नागपूर ग्रामीण 12 ... 
भंडारा 30 07 
वर्धा 21 06 
चंद्रपूर 23 17 
गोंदिया 20 11 
गडचिरोली 11 01 

Web Title: vidarbha news hotel MSEB