नवजात बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

नवजात बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

अकाेला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रुग्णालयात  एका नवजात बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न सुरक्षा रक्षक प्रतिभा लांडे व परिचारिका जया खांबलकर यांच्या सतर्कतेमुळे फसला. आराेपी महिलेला सिटी काेतवाली पाेलिसांनी अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयातील प्रीमॅच्युअर बेबी केअर युनिट वार्ड क्रमांक २३ मध्ये साेनू संदीप अंबाडरे यांच्या नवजात बालकाला ठेवण्यात आले हाेते. या वाॅर्डात बाळाच्या आईशिवाय इतरांना जाण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुनिया नामक ३० वर्षीय महिलेने वार्ड क्रमांक २३ मध्ये प्रवेश केला. जवळच बसलेल्या एका मातेसाेबत आराेपी महिला बाेलत बसली. काही वेळातच संधी साधून सुनियाने एका नवजात बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच वाॅर्डातील परिचारिका जया खांबलकर यांनी

अपहरणकर्त्या महिलेस हटकले. तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षक प्रतिभा लांडे यांनी सुनियाला पकडले. हा प्रकार रुग्णालय प्रशासनाला कळताच, त्यांनी महिलेला सिटी काेतवाली पाेलिसांना कळवले. पाेलिसांनी महिलेला अटक केले असून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाेलिस करत आहेत.

माेठ्या रॅकेटची शक्यता
जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात गुरुवारी घडलेल्या प्रकारात माेठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाेलिसांच्या माहितीनुसार, आराेपी महिला बिहारमधील बहादूर गंज येथील रहिवासी आहे. बालकाचे अपहरण करण्यासाठी आणखी दाेघांची तिला मदत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वाेपचारमधील सीसी कॅमेऱ्याच्या मदतीने इतर आराेपींचा शाेध घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिनाभरातील दुसरा प्रकार
महिनाभरापूर्वी खामगाव येथील शासकीय रुग्णालयातून एका नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले हाेते. काही दिवसातच महिलेचा छडा लावण्यास पाेलिसांना यश आले हाेते. चौकशीअंती आराेपी महिला दिल्ली येथील असल्याचे स्पष्ट झाले.

झालेल्या प्रकाराच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असून, सुरक्षा व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. घटनेमुळे जीएमसीची सुरक्षा व्यवस्था बळकट झाल्याचे सिद्ध झाले, असे म्हणता येईल.
- डॉ. कुसूमाकर घाेरपडे, प्र. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकाेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com