विदर्भात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - केरळमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झालेला नैॡत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) त्यानंतर काहीसा कमजोर पडल्याने विदर्भातही आगमन थोडे उशिरा होणार आहे. मॉन्सूनने पुन्हा वेग घेतला असला तरी, विदर्भात यायला आणखी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत संथगतीने प्रवास करणाऱ्या मॉन्सूनने मंगळवारपासून पुन्हा जोर पकडला आहे. मॉन्सूनची सध्याची पोषक स्थिती लक्षात घेता मॉन्सून लवकरच कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे.

नागपूर - केरळमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झालेला नैॡत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) त्यानंतर काहीसा कमजोर पडल्याने विदर्भातही आगमन थोडे उशिरा होणार आहे. मॉन्सूनने पुन्हा वेग घेतला असला तरी, विदर्भात यायला आणखी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत संथगतीने प्रवास करणाऱ्या मॉन्सूनने मंगळवारपासून पुन्हा जोर पकडला आहे. मॉन्सूनची सध्याची पोषक स्थिती लक्षात घेता मॉन्सून लवकरच कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे. येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये मॉन्सूनचे विदर्भात आगमन होऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.  हवामान विभागाने येत्या गुरूवारी विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.