पोलिस नक्षल चकमकीत एक नक्षलवादी ठार 

मनोहर बोरकर
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

रोपी गांव जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अचानक गोळीबार केला. उत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षली ठार झाला.इतर माओवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले

एटापल्ली - तालुक्यातील जारावंडी पोलिस स्टेशन हद्दितील रोपी गांव जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एका पुरुष नक्षल्याला पोलिसांनी ठार केले आहे. 

आज (शुक्रवार) सकाळी 7 दरम्यान जारावंडी पोलिस व गडचिरोली विशेष पोलिस दल नक्षल शोध मोहीम राबवित असतांना रोपी गांव जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अचानक गोळीबार केला. उत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षली ठार झाला.इतर माओवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले.

ठार नक्षल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी व ओळख पटविण्यासाठी गडचिरोली येथे नेण्यात आला आहे. पोलिसांकडून नक्षल शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

टॅग्स