डॉ. पंजाबराव देशमुख बॅंकेच्या अध्यक्षाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

अमरावती - अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष संजय ऊर्फ गजानन माधवराव वानखडे (वय 55) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

अमरावती - अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष संजय ऊर्फ गजानन माधवराव वानखडे (वय 55) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वर्धा बॅंकशाखेत झालेल्या अपहारामुळे मनस्ताप झाल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. ही चिठ्ठी राजापेठ पोलिसांनी जप्त केली. वानखडे हे पहिल्यांदा 2010 मध्ये बॅंकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ दीड वर्षाचा होता. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी स्वत:चे स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यात मिळालेल्या यशामुळे ते दुसऱ्यांदा बॅंकेच्या अध्यक्षपदी आरूढ झाले. ते अविवाहित होते व एकटेच समर्थ कॉलनीत राहत होते. सोमवारपासून ते कुणाला दिसले नव्हते. बुधवारी रात्री दुर्गंधी आल्याने परिसरातील काही लोकांनी याची माहिती त्यांचे बंधू, तसेच पोलिसांना दिली. राजापेठ पोलिसांनी काही चिठ्ठ्या जप्त केल्या. त्यापैकी एक चिठ्ठी वर्धा बॅंकेत झालेल्या अपहाराशी संबंधित होती, तर उर्वरित चिठ्ठ्या या नातेवाइकांच्या नावाने लिहिल्या होत्या. अपहाराशी संजय वानखडे किंवा संचालक मंडळाचा काहीही संबंध नव्हता, असे बॅंकेचे उपाध्यक्ष संजय खडसे यांनी सांगितले.

टॅग्स