गृहराज्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या घरी चोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

लोखंडे यांच्या घरी चारचाकी वाहनामध्ये आलेल्या अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर घरामधील कपाट फोडून रोखरक्कम व मुद्देमाल लंपास केला आहे. लोखंडे यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार त्यांच्या घरातील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. हे चोरटे एका टाटा सुमो वाहनामध्ये आल्याचेही सांगण्यात येत येत आहे

अकोला - मलकापुरात राहणारे रविंद्र लोखंडे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून ३० हजार रुपयांचा एेवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. लोखंडे हे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे स्वीय सहायक आहेत. खदान पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोखंडे यांच्या घरी चारचाकी वाहनामध्ये आलेल्या अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर घरामधील कपाट फोडून रोखरक्कम व मुद्देमाल लंपास केला आहे. लोखंडे यांनी खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार त्यांच्या घरातील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. हे चोरटे एका टाटा सुमो वाहनामध्ये आल्याचेही सांगण्यात येत येत आहे. 

Web Title: vidarbha news: theft