महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या काकडदरा येथे कार्यशाळा

Wardha
Wardha

आर्वी (जि. वर्धा) : पाणी फाऊंडेशन च्या वॉटर कप २०१८ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातुन प्रथम आलेल्या आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावातील प्रशिक्षण शिबीरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आर्वी तालुक्यातील वॉटर कप या स्पर्धेसाठी सहभाग घेतलेल्या गावातील प्रशिक्षणार्थींची स्पर्धेसाठी सुसज्ज होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामे, लोकसहभागातुन जास्तीत जास्त जल संवर्धनाची कामे करने, प्रत्यक्ष काम करीत असताना येणाऱ्या अडचणी तसेच शासनाने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी योजलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती सुमित वानखेडे यांनी दिली.

कार्यशाळेची सुरवात काकडदरा या गावात शिवार फेरी करून करण्यात आली. सन २०१७ ला स्पर्धे दरम्यान केलेली कामे तथा त्याचे उत्तम परीणाम कार्यशाळेत आलेल्या प्रशिक्षणार्थीनी अनुभवीले. काकडदरा सारख्या लहान गावानी केलेल्या कामांच्या जोरावर महाराष्ट्रात नाव कमावले आहे यातूनच प्रत्येक प्रशिक्षणार्थी उत्साहीत होऊन आपले गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रेरित झाले आहे.

काकडदरा येथे बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आलेले पाहुणे येथील कामांवर प्रभावित होत आपल्या गावाला जाऊन दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहे. काकडदरा येथे आलेल्या पाहुण्यांना काकडदराची आठवन नेहमी राहावी यासाठी एक सेल्फी पॉईंट असावा अशी मागणी केली जात होती. याची पुर्तता सागाच्या लाकडापासून बनविलेल्या आकर्षक लाकडी गावदर्शक फलक काकडदरा वासियांना सुमित वानखेडे यांच्या हस्ते सस्नेह देण्यात आला.

या प्रसंगी विजय पवार तहसिलदार आर्वी, डॉ. सचिन पावडे, डॉ. वाडीभस्मे, धापके गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्वी, धर्मेद्र राऊत उपसभापती पंचायत समिती आर्वी, बरे कृषी सहायक, मोहन मिसाळ, बाळाभाऊ सोनटक्के जलप्रेमी वर्धा जिल्हा, राजू भाऊ हिवसे, जितेंद्र ठाकरे, निखिल कडू अध्यक्ष सरपंच संघटना आर्वी तालुका, दिनेश डेहनकर उपसरपंच ईठलापूर,योगेश ताजनेकर, रितेश लुनावत, समदुरा राऊत सरपंच सर्कसपुर, राणी गोरले ग्रामपंचायत सदस्या इत्यादीची उपस्थिती होती. पाणी फाऊंडेशन चे आर्वी तालुका समन्वयक भुषन कडू, राम अंभोरे, प्रविण डोणगावे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com