विदर्भातील पहिली ब्रेल व टॉकिंग बुक्स लायब्ररी अकाेल्यात

याेगेश फरपट
सोमवार, 22 मे 2017

दृष्टीक्षेपात सुविधा
या ग्रंथालयात अंध बांधवांना निशुःल्क अभ्यासक्रमावरील आधारीत ब्रेल बुक्स, टॉकींग बुक्स उपलब्ध असतील. याशिवाय संगणक प्रशिक्षण, ब्रेल लिपीचे प्रशिक्षण, माेबिलीटी ट्रेनिंगसह शैक्षणीक अभ्यासक्रमासाठी विशेष मदत उपलब्ध असेल. शिवाय दिवसभर अभ्यासाची सुविधा असेल.

अकाेला - विदर्भातील अंध बांधवांना राेजगारासह नाेकरीच्या अनेक संधी उपलब्ध हाेण्यासाठी नॅशनल असाेसिएशन फॉर दि ब्लाईंड साेसायटी अकाेला व श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकाेलाच्या इन्क्लुजन सेलच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातीलच नव्हेतर विदर्भातील पहिली ब्रेल व टॉकींग बुक्स लायब्ररी सुरु करण्यात येत आहे.

निसर्गतःच झालेल्या अन्यायामुळे आपल्या जीवनात आलेल्या अंधत्वावर अथक परिश्रमामुळे मात करून अंध बांधव नवनविन शिखरे पादाक्रांत करीत आहेत. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतीक क्षेत्रात अंध बांधवांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या या यशासाठी लुईब्रेल संशाेधीत ब्रेल लिपी व आॅडीआे बुक्सचे महत्वपूर्ण याेगदान आहे. आधुनिक काळात ब्रेल बुक्स बराेबर नवनविन संगणीकृत ई-बुक्स, डी.व्ही.डी व टॉकींग बुक्स यांचीही मदत अंध बांधवांना शिक्षण घेतांना हाेत असते. या ग्रंथालयाचा उपयाेग शहरी व ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना हाेणार आहे. या ग्रंथालयाच्या माध्यमातून अंध बांधवांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी नॅशनल असाेसिएशन फॉर दि ब्लाईंड जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश पाटील, मानद सचिव राम शेगाेकार, प्रा. विशाल काेरडे, आमदार रणधीर सावरकर व सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुभाष भडांगे, ग्रंथपाल डॉ. आशिष राऊत, उपप्राचार्य डॉ. एस.पी.देशमुख, रजिष्ट्रार संजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याठिकाणी प्रा. विशाल काेरडे यांच्या मार्गदर्शनात भूषण माेडक व विशाल भाेजने ग्रंथालयीन कामकाजासाठी मदत करतील.

दृष्टीक्षेपात सुविधा
या ग्रंथालयात अंध बांधवांना निशुःल्क अभ्यासक्रमावरील आधारीत ब्रेल बुक्स, टॉकींग बुक्स उपलब्ध असतील. याशिवाय संगणक प्रशिक्षण, ब्रेल लिपीचे प्रशिक्षण, माेबिलीटी ट्रेनिंगसह शैक्षणीक अभ्यासक्रमासाठी विशेष मदत उपलब्ध असेल. शिवाय दिवसभर अभ्यासाची सुविधा असेल.

नाव नाेंदणी सूरू
ही सुविधा माेफत असल्याने इच्छुक अंध बांधवांनी प्रा. विशाल काेरडे (माे.नं. ९४२३६५००९०) व साेसायटीचे सचिव राम शेगाेकार (माे.नं. ९७६५०१३२५५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष डॉ. अविनाश पाटील यांनी केले आहे.
* बरेचदा अंध अाहे म्हणून अनेकजण यशापासून दुर राहतात. अशा अंध बांधवांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- प्रा. विशाल काेरडे, शिवाजी महाविद्यालय अकाेला