केंद्रीयमंत्री गडकरींच्या भाषणात विदर्भवाद्यांचा गोंधळ 

Vidarbhavadi protester create a obstacle union minister gadkaris speech at nagpur
Vidarbhavadi protester create a obstacle union minister gadkaris speech at nagpur

नागपूर - विविध प्रकल्पांचे भूमीपूजन व सामंजस्य करार समारंभात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी भाषणाला उठताच विदर्भवाद्याने 'पहिले वेगळ्या विदर्भाबाबत बोला साहेब' असे म्हणत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने कार्यक्रम शांततेत सुरू झाला. 

रेशिमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आज महापालिका, महावितरण, महामेट्रो, महानिर्मिती, भारतीय रेल्वे, वेकोली, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध कामांचे भूमीपूजन, सामंजस्य करार यावेळी पार पडले. त्यामुळे दोन हजार आसनसंख्येचे सुरेश भट सभागृहात अधिकारी, मनपातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी भाषण देण्यासाठी ध्वनीक्षेपनाकडे जात असताना गर्दीतील एकाने उठून 'साहेब, पहिले वेगळ्या विदर्भाबाबत बोला, रोजगाराबाबत बोला', अशी ओरड सुरू केली. त्यामुळे दोन हजार लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यामुळे सभागृहातील सुरक्षा रक्षक, पोलिसांचीही तारांबळ उडाली. विदर्भवाद्याच्या या गोंधळातही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्याला खाली बसण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर केंद्रीयमंत्री गडकरी यांनी भाषण केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी 'ज्या नेत्यांनी स्वतःच्या मुलांशिवाय विचार केला नाही, त्यांच्या चेलेचपाट्यांना गांभीर्याने घेऊ नये', असे आवाहन उपस्थितांना करतानाच कॉंग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. त्यांनी पूर्ण पाच वर्षात 50 हजार रोजगार नागपूरकरांना उपलब्ध होईल, असे नमुद करीत 'त्या' विदर्भवाद्याच्या प्रश्‍नाचे स्पष्टीकरणही दिले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com