प्रभागरचनेमुळे भाजपने केले अनेकांना गारद?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नागपूर - पुढच्या वर्षी होणारी महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. एका प्रभागात चार सदस्य राहणार आहेत. त्यासाठी आरक्षण जाहीर करताना प्रभागरचना सत्ताधारी भाजपसाठी अनुकूल करीत असताना विरोधकांचे क्षेत्र विस्कळीत केले आहे. अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर करताना ‘त्या’ प्रभागात भाजप मतदार असलेले क्षेत्र जोडले. त्यात भाजपच्या दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग एकत्र जोडले. चार सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने छोट्या पक्षांसह अपक्षांचीही चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे छोटे विरोधक कमी होणार आहेत. प्रभागरचनेतून भाजपने एकाच दगडात अनेकांना गारद केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

हुडकेश्‍वर, नरसाळा ग्रामपंचायत महापालिका हद्दीत समाविष्ट केल्याने पालिकेची सदस्यसंख्या सहाने वाढून १५१ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार ही प्रभागरचना तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासनाचा आहे. तरी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर ही रचना तयार करण्याचा आरोप विरोधकांचा आहे. अनुसूचित जातीच्या सर्वाधिक जागा उत्तर नागपुरात आरक्षित केल्यात. यातील सर्वाधिक महिलांसाठी आहेत. उत्तर नागपूर भाजपसाठी फारसा अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, येथे काँग्रेसकडे महिला नेत्यांचा अभाव आहे. बसपच्या नगरसेवकांचे क्षेत्र एकतर संपूर्णपणे जोडण्यात आले किंवा अनुकूल क्षेत्र दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आले. त्यामुळे तिकिटासाठी त्यांची आपसातच रस्सीखेच होणार आहे. 

पूर्व नागपूर काँग्रेससाठी फायदेशीर?
पश्‍चिम आणि दक्षिण-पश्‍चिम नागपुरात चार ते पाच प्रभाग संपूर्ण विजयाचे लक्ष निश्‍चित केले. पूर्व नागपुरात काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा आहे. मात्र, इतरत्र काँग्रेस आणि इतर पक्षांना फारसा फायदा होणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेऊन प्रभागरचना तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. असे असले तरी प्रत्यक्षात किती जागा निवडून येतात, हे मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

दक्षिण नागपुरात चुरस
दक्षिण नागपूरमध्ये अनुसूचित जातीच्या प्रभावाचे क्षेत्र एकत्र जोडण्यात आल्याने मोठी चुरस वाढली आहे. याचा फायदा भाजपला होण्याची शक्‍यता आहे. काही क्षेत्र भाजपबहुल क्षेत्रात समाविष्ट करताना भाजपच्या दिग्गज नगरसेवकांचे क्षेत्र एकत्र जोडले आहे. काँग्रेस नगरसेवकांचे क्षेत्रही एकत्रित केल्याने उमेदवारीसाठी वाद होण्याची शक्‍यता आहे. तर, काही ठिकाणी काँग्रेस बेल्ट हे भाजपचे वर्चस्व असलेल्या भागात जोडण्यात आले. 

Web Title: ward structure planning in nagpur by bjp