वर्धा: अपघातात जलतरणपटूसह दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

दीपक गाडे व जलतरणपटू अथर्व मिलिंद शिंदे (वय 14) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चालक नितीन आनंदराव माने (वय 43) व त्यांचा मुलगा ओम नितीन माने हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सातारा येथील पोतदार इंटरनॅशनल स्कुलचे हे विदयार्थी आहेत.

वर्धा : अमरावती-नागपूर महामार्गावर राजनी शिवारात आज (रविवार) सकाळी कार नदीवरील पुलाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात जलतरणपटूसह अन्य एकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर महामार्गावर राजनी शिवारात हा अपघात झाला. कार नदीवरील पुलाला धडकली असून, गाडीचा चक्काचूर झाला. जलतरणपटू अथर्व मिलिंद शिंदे (वय 14) याच्यासह सातारा जिल्ह्याचा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा मृत्यू झाला. सातारा येथून नागपूरला जलतरण स्पर्धेसाठी जात असताना अपघात झाला.

दीपक गाडे व जलतरणपटू अथर्व मिलिंद शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चालक नितीन आनंदराव माने (वय 43) व त्यांचा मुलगा ओम नितीन माने हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सातारा येथील पोतदार इंटरनॅशनल स्कुलचे हे विदयार्थी आहेत. नागपूर जिल्हयातील कामठी येथे सीबीएसई साऊथ झोन जलतरण स्पर्धा असल्याने येथे जात होते. राजनी जवळ उजव्या बाजूने ट्रक जात असताना डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना नदीवरील पुलाच्या कठड्याला कारने धडक दिली.

Web Title: Wardha news accident on Nagpur-Amravati highway 2 dead