खासगी बसच्या अपघातात पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

दुचाकीला धडक देऊन घाटात कोसळली बस

दुचाकीला धडक देऊन घाटात कोसळली बस
वर्धा - दुचाकीला धडक देऊन अनियंत्रित झालेली खासगी प्रवासी बस घाटात कोसळली. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समुद्रपूर तालुक्‍यातील शेडगाव पाटीजवळ रविवारी (ता. 28) सकाळ हा अपघात घडला. आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. अपघातग्रस्त बस नागपूरची असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.