वाशीम जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

हराळ - सतत तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदा चांगल्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. नुकतीच कोवळी पिके उगवत असून, वन्यप्राणी शेतशिवारात हैदोस घालत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत होत आहे.

वाशीम जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळाचे चटके सहन करीत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. चांगला पाऊस होत असल्यामुळे पिके उगवू लागली आहेत. परंतु शेतशिवारात हरिण, रानडुक्कर, वानर हैदोस घालत असल्याने कोवळ्या पिकांची नासधूस होत आहे. सतत तीन वर्षांपासून शेती पिकलीच नसल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. त्यामुळे मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी खरिपात शेतात उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली आहे. नुकतीच पिके उगवत असताना वन्यप्राणी शेतात हैदोस घालत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतशिवारातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Washim district for wild animals