वाशीम जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाची धग कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

शेतकरी संपाला एका आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतरही वाशिम जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे. वाशीम तालूक्‍यातील माळेगाव येथील ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) एक दिवस चूल बंद ठेवून कडकडीत उपवास केला.

वाशीम - शेतकरी संपाला एका आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतरही वाशिम जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे. वाशीम तालूक्‍यातील माळेगाव येथील ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) एक दिवस चूल बंद ठेवून कडकडीत उपवास केला.

कारंजा येथे आमदार बच्चू कडू, चंद्रकांत वानखेडे यांच्या नेतृत्वाताखाली तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर वाशीम येथे कॉंग्रेस कमिटीच्यावतीने मोर्चा काढून भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. मालेगावात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकाराचा पुतळा जाळून मुंडण केले.