तुरीच्या घुगऱ्या करून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

राज्यशासनाने आश्वासन देऊनही नाफेडची तूर खरेदी बंद असल्यामुळे वाशीम तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तूरीच्या घुगऱ्या करून सरकारचा निषेध केला.

वाशीम - राज्यशासनाने आश्वासन देऊनही नाफेडची तूर खरेदी बंद असल्यामुळे वाशीम तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तूरीच्या घुगऱ्या करून सरकारचा निषेध केला.

शासनाने दूसऱ्यांदा तूर खरेदीची हमी घेतल्यानंतर टोकण दिलेल्या शेतकऱ्यांची तूर नाफेडने खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दहा दिवसापासुन नाफेडने वाशीम बाजार समितीत खरेदी बंद केली आहे परिणामी एकट्या वाशीम तालूक्‍यात 7 हजार 350 शेतकर्यांची अंदाजे दीड लाख क्विंटल तूरीची अद्यापही मोजणी झालेली नाही. शासनाच्या या धोरणाच्या विरोधात बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरीवर्गाने येथील पूसद नाका चौकात तूरीच्या घूगऱ्या शिजवून शासनाचा निषेध केला आहे.