वाशीम जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

वाशीम - सततची नापिकी, भाड्याने केलेल्या शेतीसाठी घेतलेली हातउसनी रक्कम कशी फेडावी, उपवर मुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत दाभा (ता. मंगरूळपीर) येथील रामभाऊ सवाईराम जाधव या शेतकऱ्याने गुरुवारी कीटकनाशक घेऊन शेतात आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेमध्ये वाशीम तालुक्‍यातील तोंडगाव येथील दत्ता शालिकराम गोटे (वय 46) या शेतकऱ्यानेही कर्जाच्या विवंचनेतून विष प्राशन करून आज आत्महत्या केली.