शहरात कलिंगडाची मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

गोंदिया - उन्हाळ्याची सुरुवात झाली की, मधुर गारवा देणाऱ्या कलिंगडाची लगेच आठवण येते. त्यातच आता बाजारपेठा कलिंगडाच्या राशीने सजू लागल्या आहेत. बाजारात आता कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे. 

जिल्ह्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या नदीकाठच्या ग्रामीण भागात या कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीने आकर्षित होऊन ग्रामीण भागातील शेतकरी आता कलिंगड व डांगराच्या शेतीकडे वळत चालला आहे. विशेषत: ढिवर समाजातील शेतकरी या शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. 

वेलवर्गीय पीक असल्याने हे पीक विशेषत: नदीपात्रात घेतले जाते; तर काही शेतकरी कालव्याकाठच्या शेतजमिनीतही या पिकाची लागवड करतात. आजच्या काळात भरघोस पीक  घेता यावे, याकरिता सुधारित शेतीच्या अनुषंगाने हायब्रीड जातीच्या बियाण्यांची पेरणी केली जाते. त्यामुळे आता बाजारपेठेत बाराही महिने कलिंगड उपलब्ध असतात. मात्र, उन्हाळ्यात मिळणाऱ्या कलिंगडाची मजा काही औरच असते. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हाच्या पाऱ्याने जिवाची होणारी काहिली कलिंगड व डांगरच दूर करण्यात मदत करतात. वरून हिरवेगार, आत लाल व रसाळ असल्याने बच्चे कंपनीसुद्धा या फळांना आवडीने खातात. त्यातच या फळाचे शरीराला अनेक फायदे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून प्रवास करून आल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने अंगातली दाहकता कमी होते. पाण्याचे प्रमाण या फळात अधिक मात्रेत असल्याने व समप्रमाणात ग्लुकोजची मात्रा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करते. तसेच पोटॅशियमचीही मात्रा या फळात असून शरीरातील रक्‍ताची घनआम्लता समप्रमाणात ठेवण्यास मदत होते.

कलिंगड ज्याप्रमाणे आरोग्यास उपयुक्‍त आहे, त्याप्रमाणे त्याच्या बियासुद्धा शरीरासाठी तेवढ्याच लाभदायक आहेत. कलिंगडाच्या बियांना वाळविल्यानंतर त्यातील मगज सेवन केल्याने ते धातू पौष्टिक आहेत. असे बहुगुणी कलिंगड आता बाजारात आले असून त्यांची मागणी वाढली आहे.