पाणी पिताेय की रसायन?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

अकाेला : अकाेला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील भुजलात ‘नायट्रेट’चे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. तालुक्यातून घेण्यात आलेल्या ३५६ पाणी नमून्यांपैकी ३४० पाणी नमूने नायट्रेटने बाधित आढळले आहेत.

अकाेला : अकाेला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील भुजलात ‘नायट्रेट’चे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. तालुक्यातून घेण्यात आलेल्या ३५६ पाणी नमून्यांपैकी ३४० पाणी नमूने नायट्रेटने बाधित आढळले आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यात ९७ तर तेल्हारा तालुक्यात ९५ पाणी नमूने नायट्रेटने बाधित आढळले आहेत. जिल्हाभर नायट्रेट बाधित आढळलेल्या ७२९ पाणी नमून्यांमध्ये ४५ मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त नायट्रेट आढळल्याने भुजलाने धाेकादायक पातळी गाठल्याचे भुजल वैज्ञानिकांचे मत आहे. जिल्ह्यात बनवण्यात आलेल्या विहिरी व हातपंपाच्या पाण्याचे प्रत्येक वर्षी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येते. त्यामुळे एक आॅक्टाेबर २०१७ पासून जिल्ह्यामधील सातही तालुक्यातील दाेन हजार ९०१ भुजल स्त्राेतांचे नमूने गाेळा करण्यात आले.

संबंधित नमून्यांचे रासायनिक परीक्षण करण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. संबंधित भुजल पाणी नमून्यांचे रासायनिक परीक्षण केल्यानंतर दुषित आढळलेल्या ७८५ पाणी नमून्यापैकी ७२९ पाणी नमून्यात नायट्रेटचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. काही ठिकाणी ते धक्कादायक पातळीपर्यंत सुद्दा पाेहचल्याचे आढळून आले आहे. भुजलाच्या रासायनिक परीक्षणात ‘नायट्रेट’सह इतर रासायनिक घटक आढळल्यामुळे भुजल धाेकादायक हाेत असल्याचे दिसून येत आहे.

 

  • इतर तालुकेही नायट्रेट बाधीत

जिल्ह्यामधून सर्वाधिक मुर्तीजापूरातील ३४० पाणी नमून्यात ‘नायट्रेट’ आढळले आहे. तर बार्शीटाकळी तालुक्यातील ९७, तेल्हारा ९५, अकाेला ७०, अकाेट ६९, पातूर ५० तर बाळापूर तालुक्यात आठ पाणी नमूने ‘नायट्रेट’ बाधित आढळले आहेत.

 

  • रासायनिक परीक्षणात दुषित आढळलेले पाणी नमूने

० नायट्रेट - ७२९
० टाेटल हार्डनेस - १४१
० क्षारयुक्त - १२१
० टीडीएस - ८९
० टर्बिडीटी (एनटीयू) - ५३
० क्लाेराईड - १९
० लाेह - ०१

Web Title: we drirnk water or chemical