उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची खैर नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

तिरोडा - उघड्यावर शौचास गेल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरून आरोग्य धोक्‍यात येते. त्यामुळे आता उघड्यावर शौचास बसायचे असेल; तर दंड भरण्याचीही तयारी ठेवा, असे फर्मानच गुड मॉर्निंग पथकाने काढले आहे. 

तिरोडा - उघड्यावर शौचास गेल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरून आरोग्य धोक्‍यात येते. त्यामुळे आता उघड्यावर शौचास बसायचे असेल; तर दंड भरण्याचीही तयारी ठेवा, असे फर्मानच गुड मॉर्निंग पथकाने काढले आहे. 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने  विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गोंदिया जिल्हा मार्च २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा विडा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी उचलला आहे. त्यानुसार, त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. यात ग्रामीण व शहरी भागातही शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.  याकरिता गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे व्हिडिओ शूटिंग करून गुन्हे दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

तिरोडा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी एच. एस. मानकर यांच्या नेतृत्वात गुड मॉर्निंग पथकातील जिल्हास्तरीय समन्वयक अतुल गजभिये, सुरेश पटले, अनुप रंगारी यांच्या पथकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्‍यातील सुकडी, बोदलकसा, पिंडकेपार ग्रामपंचायत परिसरात धडक दिली. या वेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांनी आपणावर कार्यवाही होईल, या भीतीने पळ काढला. सुकडी येथील ४ जण पथकाच्या जाळ्यात अडकले. त्यांचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. 

परिणामी त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात आली. दंड न भरल्यास त्यांच्या घर करात दंडाची रक्कम जोडण्यास ग्राम सचिवास सांगण्यात आले. या कारवाईमुळे उघड्यावर बसणाऱ्यांची मात्र भंबेरी उडाली आहे.

विदर्भ

अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू? नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

विजेच्या धक्‍क्‍याने घेतला मुलांचा बळी नागपूर - उच्चदाबाच्या विद्युत तारांमुळे सुगतनगरमधील दोन जुळ्या भावांच्या मृत्यूला...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सिमेंट रस्त्यांवरून वृद्ध, गर्भवतींचा प्रवास धोक्‍याचा नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्यास महापालिकेने...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017