अपेक्षित महाविद्यालयात मिळेल प्रवेश!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

अकाेला : यावर्षीसुद्धा अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आॅफलाईन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या त्याला बुधवारपासून (ता. 13) सुरुवात हाेत आहे. 30 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी साेमवारी (ता. 11) आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

अकाेला : यावर्षीसुद्धा अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आॅफलाईन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या त्याला बुधवारपासून (ता. 13) सुरुवात हाेत आहे. 30 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी साेमवारी (ता. 11) आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 13 ते 17 जूनपर्यंत जिल्हा परिषद आगरकर विद्यालय, स्टेशन राेड अकाेला येथे प्रवेश अर्जांची विक्री करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र घेतल्यानंतर समितीने निवडलेल्या संगणक केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र आॅफलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही. प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समिती शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या नियंत्रणाखाली प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहे. समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नानाेटी, उपाध्यक्ष उपप्राचार्य डॉ. अविनाश बाेर्डे, सचिव गजानन चाैधरी, प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, तसेच महिला प्रतिनिधी भारती दाभाडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिली. पत्रकार परिषदमध्ये केंद्रीय प्रवेश समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते.

विद्यार्थ्यांना मिळेल हमखास प्रवेश
महापालिका क्षेत्रातील तसेच इतर ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये हमखास प्रवेश मिळणार आहे. अकाेला मनपा क्षेत्रात एकूण 53 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा असून या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आठ हजार 100 प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे. त्यांना अकरावीमध्ये हमखास प्रवेश मिळेल. त्यामुळे आपल्याला मनपा क्षेत्रामध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी भावना विद्यार्थ्यांनी व पालकांनी ठेवून नये, असे आवाहन प्रकाश मुकुंद व सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठाेड यांनी केले आहे.

Web Title: will get admission in expected college