बॅग कापून महिलेचे 60 हजाराचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कोणीतरी अनोळखी 22 वर्षीय महिलेने त्यांच्या पायाजवळ ठेवलेली एअर बॅगची चैन उघडली व ज्वेलरी बॉक्स कापून सोन्याची पोथ, सोन्याचा हाफसेट, अंगठी 2 नग असा एकुण 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

खामगाव - नांदुरा ते खामगाव बसमध्ये प्रवास करीत असलेल्या नांदुरा येथील महिलेची बॅग कापून 60 हजाराचे दागिणे लंपास करण्यात आले असून आज याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदुरा येथील अनुराधा संजय राठी (वय 34) यांनी खामगाव शहर पोस्टेला तक्रार दिली की, त्या सोमवारी 28 मे ला जळगाव-अकोला बसमध्ये नांदुरा ते खामगाव त्यांच्या पतीसह प्रवास करीत होत्या. या दरम्यान कोणीतरी अनोळखी 22 वर्षीय महिलेने त्यांच्या पायाजवळ ठेवलेली एअर बॅगची चैन उघडली व ज्वेलरी बॉक्स कापून सोन्याची पोथ, सोन्याचा हाफसेट, अंगठी 2 नग असा एकुण 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अनोळखी 22 वर्षीय विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The womans sixty thousands jewelery stolen