मेयोत चार हजार महिलांची झाली आरोग्य तपासणी - डॉ. प्रदीप दीक्षित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)च्या वतीने ऑक्‍टोबर २०१६ पासून स्तन कॅन्सरवर जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली. अवघ्या चार महिन्यांत चार हजार महिलांची चाचणी करण्यात आली. यात ९२ महिलांना स्तनाचा कॅन्सर आढळला असल्याची माहिती पुढे आली. 

आयबीई यंत्राच्या सहाय्याने महिलांची प्राथमिक चाचणी करण्यात आली. यात ९२ महिलांना स्तन कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्यावर्षी १ लाख ४५ हजार महिलांना स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाले. मात्र, यातील ७० हजार महिला वेळीच निदान न झाल्याने दगावल्या. स्तन कॅन्सर हे मृत्यूचे पाचवे कारण आहे. सरासरी एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या लोकसंख्येत ५२ टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सर आढळतो. 

अकाली दगावणाऱ्या या महिलांचे प्राण वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निदान अभियान राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मेयोत स्तन कॅन्सर निदान अभियान राबविण्यात आले, असल्याचे महिला दिनाच्या पर्वावर डॉ. दीक्षित यांनी सांगितले. या वेळी  महिला दिनाचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला.   

नागपुरात आयबीई मशीनच्या सहाय्याने चाचणी करीत असताना कोणत्या महिलेच्या स्तनामध्ये गाठ आढळली तर त्या महिलेला सोनाग्राफी, मॅमोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. पं.  दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन रिसोर्सच्या सहकार्यातून स्तन कॅन्सर जागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. डॉ. विरल कामदार, रेडिओडॅग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सतीश सोरते, प्रा. डॉ. रमेश चाफले, प्रा. डॉ. अनघा देशपांडे, अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, प्रा. डॉ. अलका पाटणकर, डॉ. सागर पांडे, डॉ. सुषमा ठाकरे, डॉ. सुनील लांजेवार, डॉ. यशवंत कुळकर्णी, डॉ. नंदू पांडे, डॉ. कोईचाडे आणि डॉ. जोशी उपस्थित होते.
 
एका छोट्याशा प्रोब स्कॅनिक उपकरण रेडिएशनमुक्त आणि वेदनाविरहित आहे. यात ३५ ते ८० वयोगटातील निदान झालेल्या ९२ महिलांचे वर्गीकरण करून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असेल अशा महिलांवर मोफत उपचार होतील. मात्र, उपचारासाठी केवळ १५ महिला आल्या. यापुढेही हे अभियान सुरू राहील. विशेष असे की, मेयोतील पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून हे अभियान राबवले आहे.
- डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, मेयो

Web Title: women health cheaking in mayo hospital