चारित्र्यावर संशय घेऊन महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नागपूर -  चारित्र्यावर संशयावरून व्यक्‍तीने महिलेचा गळा आवळून खून केला. मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला. हे बिंग फुटल्यानंतर नंदनवन पोलिसांनी आरोपी शेख शब्बीर शेख रमजान (वय 44, मोठा ताजबाग, उमरेड रोड) याला अटक केली आहे. शाहीन अज्जुम अहमद अली (वय 27, रा. राऊतनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

शाहीन अली याचा नऊ वर्षांपूर्वी अहमद अलीशी विवाह झाला होता. मात्र, तो बेरोजगार असल्याने आर्थिक चणचण असायची. त्यांना दोन मुली झाल्या. दरम्यान, तिची शेख शब्बीरशी ओळख झाली. त्याचा राऊतनगरात कूलर बनविण्याचा मोठा कारखाना आहे. शब्बीरशी तिचे सूत जुळल्याने आर्थिक गरजा पूर्ण होत असल्याने तिने पतीला सोडून दिले. गेल्या सात वर्षांपासून ती शब्बीरने बांधून दिलेल्या कारखान्याजवळील खोलीत राहू लागली. त्यानंतर तिला शब्बीरकडूनही एक मुलगा आणि मुलगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र, शाहीनचे वस्तीतील एका युवकाशी संबंध असल्याचा संशय शब्बीरला होता. त्यामुळे दोघांत खटके उडायचे. शब्बीर दारूच्या नशेत शाहीनला बेदम मारहाण करायचा. शनिवारी रात्री आठच्या सुमारास शब्बीर शाहीनच्या घरी आला. दोघांत जुन्याच कारणावरून वाद झाल्यानंतर शब्बीरने मारहाण करून तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकवला. ही घटना शाहीनच्या मुलीने बघितली. तिने आजी रईसा अनवर पठाण (वय 42, रा. रामकृष्णनगर) यांना फोनवरून सांगितली. रईसा शाहीनच्या घरी पोहोचल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. नंदनवन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला. शब्बीरने खुनाची कबुली दिली आहे.

Web Title: women murder