कुख्यात गुंडाचा गळा चिरून खून 

कुख्यात गुंडाचा गळा चिरून खून 

नागपूर - तब्बल अकरा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला कुख्यात गुंड राजेश सुरेश बेलेकर उर्फ राजेश गंथाळे (वय 28, गंगाजमुना) याचा मित्रांनीच भर चौकात गळा चिरून खून केला. आज बुधवारी सकाळी आठ वाजता वेश्‍यावस्ती गंगाजमुनात हत्याकांड उघडकीस आले. या हत्याकांडामुळे गंगाजमुनात एकच खळबळ उडाली आहे. रोशन चौरसिया (26, रा. पारडी), सोनू साखरे (28, रा. ज्योतीनगर, खदान) आणि संतोष श्रीवास (30, रा. वैशालीनगर) यांना पोलिसांनी अटक केली. 

कुख्यात राजेश हा गुन्हेगारीत सक्रिय होता. 1999 आणि 2001 साली त्याने तीन हत्याकांड घडवून आले होते. खुनाच्या गुन्ह्यातून अनेक वर्षांनी तो कारागृहाबाहेर आला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने वेश्‍यावस्तीमध्ये एका रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून अवैधपणे सायकल स्टॅण्ड सुरू केले. वेश्‍यावस्तीत येणाऱ्या लोकांकडून गाडी पार्क करण्यासाठी तो पैशाची वसुली करायचा. तो विवाहित असून पत्नी, वृद्ध आई आणि दोन मुले आहेत. त्याच्याविरुद्ध तब्बल 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोशन हा त्याचा मित्र होता. रोशन आणि इतर आरोपी हे ऑटोरिक्षा चालविण्याचे काम करतात. रोशन हा राजेशला सायकल स्टॅण्ड चालविण्याकरिता मदत करायचा. तीन महिन्यांपूर्वी रोशनने राजेशकडून काही हजार रुपये उधार घेतले होते. यातून तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडणही झाले होते. त्यावेळी इतरांच्या मध्यस्थीने वाद सोडविण्यात आला. परंतु राजेशने त्याला "गेम' करण्याची धमकी दिली होती. रोशन हा आपला खून होण्याच्या भीतीत वावरत होता. मात्र, आपल्यावर हल्ला होण्यापूर्वीच त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजेशच्या खुनाचा सापळा रचला. सकाळी 6 वाजेपासून आरोपी गंगाजमुनात राजेशची वाट बघत होते. सकाळी राजेश दिसताच आरोपींनी त्याला पकडले आणि सत्तूरने त्याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर लोकांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. 

दोघेही कुख्यात आरोपी 
2013 साली राजेश आणि त्याचा खून करणारा रोशन हे दोघेही एका गंभीर स्वरूपाच्या एकाच गुन्ह्यात आरोपी होते. त्यानंतर राजेशविरुद्ध गुन्हे दाखल झाले नाहीत. तर रोशनविरुद्ध एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. दोघेही गंगाजमुनातील दलालांकडून महिन्यांची वसूल करून काही पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवीत होते. 

सैनिकाचा केला होता खून 
जम्मू-काश्‍मीर सीमेवरील कार्यरत सैनिक मित्रासह गंगाजमुनात आला होता. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास राजेश गंथाळेने लूटमार करण्याच्या उद्देशाने त्याला मारहाण केली. मात्र, धष्टपुष्ठ असलेल्या जवान राजेशवर भारी पडला. त्यामुळे राजेशने त्याचा चाकूने खून केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com