यापुढे भाजपच्या मंत्र्यांसह  पदाधिकाऱ्यांची दाढी नाही

यापुढे भाजपच्या मंत्र्यांसह  पदाधिकाऱ्यांची दाढी नाही

यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्षेपार्ह विधानाने नाभिक समाजबांधव चांगलेच दुखावले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात नाभिक समाजबांधवांनी आगळ्या-वेगळ्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जाहीर माफी न मागितल्यास यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही भाजपचे मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दाढी, कटिंग करणार नसल्याची घोषणा नाभिक समाजबांधवांनी केली आहे.पुणे जिल्ह्यातील दौंड येथे भीमा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे उद्‌घाटन करताना नाभिक समाजाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे नाभिक समाजबांधव चांगलेच संतापले आहेत. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाभरात नाभिक समाजबांधवांनी निवेदन दिले.

 सोमवारी (ता.२०) जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. कमळाच्या फुलांची निशाणी असलेले शेले घालून असलेले  कार्यकर्ते, परिचित पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दाढी, कटिंग यापुढे केली जाणार नाही, असे महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतरच हे आंदोलन थांबणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com