वीज कोसळून चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

यवतमाळ - वीज पडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील वणी व आर्णी येथे रविवारी (ता. २७) घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

वणी : शेतात काम करीत असलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वणी तालुक्‍यातील कायर येथे सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

सरिता पंकज कुंटावार (वय २५) व अनसूया चौधरी (वय ४७) अशी मृतांची नावे आहेत. दोघीही कुंटावार यांच्या शेतात काम करीत असताना पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शेतातील इतर मजूर गावाकडे परत आले. मात्र, दोघींनी झाडाचा आडोसा घेतला. नेमकी त्याच ठिकाणी वीज कोसळल्याने दोघींचाही मृत्यू झाला. बराच वेळ उलटूनही त्या घरी न आल्याने नातेवाइकांनी शेत गाठले असता, ही घटना उघडकीस आली.

आर्णी : शेतात काम करीत असताना वीज पडून तालुक्‍यातील राणीधानोरा येथील दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. बाबाराव ऊर्फ भूपेंद्र फकिरा पाटील (वय ४५) व नीलेश मुजमुले (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही सकाळी शेतात कामावर गेलेले होते. दुपारी एकदरम्यान अचानक वातावरणात बदल झाला व ढगांचा गडगडाट सुरू झाला. दरम्यान, शेतात काम करीत असताना दोघांच्या जवळच वीज पडली. त्यात भाजल्याने दोघेही गंभीर झाले. त्यांच्यावर प्रथम लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: yavatmal news electricity