नाफेड करणार सोयाबीनची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नेर, (जि. यवतमाळ)  - परतीच्या पावसासह लष्करी अळीच्या प्रकोपाने सोयाबीनचे उत्पन्न घटले. नाफेड केवळ एफएक्‍यू ग्रेडच्या मालाची खरेदी करीत आहे. इतर माल खरेदी करीत नसल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. याबाबत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रधान सचिवांशी चर्चा केली. सरसकट मालाची खरेदी करण्याचे आदेश प्रशासनाला देणार असल्याचे प्रधान सचिवांनी सांगितले. 

परतीच्या पावसामुळे सोयाबीनची प्रत ढासळल्याने नाफेडकडून त्यास खरेदीस नकार दिला जात आहे. आर्द्रता, प्रत, कचरा आदी बाबी समोर करीत केवळ निवडक माल खरेदी केला जात आहे. नाफेडकडून नाकारलेला माल व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी केला जात असून, यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. ही बाब ‘सकाळ’ने आमदार ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच प्रधान सचिव बीजकुमार यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून प्रकार निदर्शनास आणून दिला. नाफेडकडून १२ च्या आतील आर्द्रता असलेला माल नियमानुसार खरेदी केला जात नाही. परंतु, शेतकऱ्यांनी आपला माल सुकवून, स्वच्छ करून आणल्यास तो खरेदी करण्यात येईल, तसे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान सचिवांनी दिली. आर्थिक संकटातील सोयाबीन उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात सध्या आठ केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू आहे. नियमानुसार केवळ एफएक्‍यू ग्रेडच्या मालाची खरेदी सुरू आहे. पावसाने डागाळलेला किंवा कमी दर्जाच्या सोयाबीनची खरेदी करावी, अशी सूचना वरिष्ठांकडून अद्याप आलेली नाही.
-जी. एन. मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, यवतमाळ.