कीटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कामठी - तालुक्‍यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कामठी तालुक्‍यातील अंबाडी येथे शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव माणिक वानखेडे (२८, रा. अंबाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

कामठी - तालुक्‍यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कामठी तालुक्‍यातील अंबाडी येथे शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव माणिक वानखेडे (२८, रा. अंबाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सुखदेव वानखेडे यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती असून शेतीवर तो वहिवाट करायचा. वडिलांच्या नावे या शेतीवर पंजाब नॅशनल बॅंकेच्या वडोदा शाखेतून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु शेती उत्पन्नात घट होत असल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्‍न गेल्या काही  दिवसांपासून उभा ठाकला होता. शेवटी याच विवंचनेतून त्याने शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधून कीटकनाशक प्राशन केले. तो बेशुध्दावस्थेत पडला असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेऊन त्याला लगेच नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठविला.

पत्नी गर्भवती
सुखदेव यांचे १६ एप्रिल २०१६ रोजी तालुक्‍यातील पडसाड येथील सोनू नामक मुलीशी लग्न झाले होते. पत्नी गर्भवती आहे. तर आईवडील वृद्ध असून वडील अपंग आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM