पशुजन्य आजार मानवापुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

नागपूर - झुनोटिक (पशुजन्य) म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारे आजार. मानवाला होणाऱ्या 60 टक्के संसर्गजन्य आजारांपैकी 75 टक्के आजारांचा उगम प्राण्यांपासून होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे पशुजन्य आजार मानवापुढे आव्हान ठरत आहेत.

नागपूर - झुनोटिक (पशुजन्य) म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारे आजार. मानवाला होणाऱ्या 60 टक्के संसर्गजन्य आजारांपैकी 75 टक्के आजारांचा उगम प्राण्यांपासून होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे पशुजन्य आजार मानवापुढे आव्हान ठरत आहेत.

पशुजन्य आजारांचा सामाजिक व आर्थिक प्रभाव पडतो. या आजारांचे व्यवस्थापन व उच्चाटन करणे गरजेचे आहे. शहरीकरण, नैसर्गिक वसाहतींवर अतिक्रमण व वातावरणातील बदलाचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. यामुळे जिवाणू व विषाणू स्वतःचा परजीवाश्रय (होस्ट) बदलवत असतात. जनुकीय उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती साथ देत नाही. अशा आजारांच्या संभाव्य धोक्‍याबाबत निश्‍चित अनुमान काढता येत नाही.

एनआयझेड केव्हा?
नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. जंगले राखीव झाल्याने प्राण्यांची संख्या वाढली. वन्यप्राणी मनुष्यावर हल्ले करतात. शिवाय, त्यांच्या संपर्कात आल्याने आजारांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे पशुजन्य आजारांचा अभ्यास व संशोधन करणारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ झुनोसीस (एनआयझेड) संस्था नागपुरात व्हावी, यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ ऍनिमल ऍण्ड रिसर्च (नावार) ही संस्था प्रयत्नरत आहे.
- डॉ. अजय पोहरकर, राष्ट्रीय सचिव, नावार

कुत्र्यांची करा नोंदणी
महापालिका दरवर्षी कुत्र्यांची नसबंदी करते. कुत्रे पाळायचे असतील तर त्यासाठी महापालिकेत त्यांची नोंदणी करावी लागते. काही जण नोंदणी न करताच कुत्रे पाळतात. मोकाट कुत्र्यांचा त्रास बहुतेकांना होतो. त्यांनी चावा घेतल्यामुळे रॅबीज हा आजार होतो. रॅबीजमुळे दरवर्षी जगात 55 हजार जणांचा बळी जातो.

शत्रू नव्हे मित्र
प्राण्यांचा मानवाशी अनादिकाळापासून संबंध आहे. गायी, म्हशी, शेळ्यांपासून दूध मिळते. प्राण्यांचे मांसही खाल्ले जाते. शेणामुळे जमीन सुपीक होते. गोवऱ्या तयार करता येतात. गांडूळखतासाठीही शेणाचा वापर केला जातो. यामुळे सेंद्रिय अन्नधान्य मिळण्यास मदत होते. देशी गायीचे मूत्र (युरिन) अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.

अशी घ्या काळजी
कुत्रा फिरवून आणल्यानंतर हात स्वच्छ धुवा
पशुपक्षी हाताळताना हातमोजे, मास्क वापरा
सर्वांग झाकणारे कपडे घाला, मच्छरदाणी वापरा
प्राण्यांची जागा फिनाईलने निर्जंतुकीकरण करा
पशुपक्ष्यांच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावा
पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करा

आजाराची कारणे
क्षयरोग - कच्चे दूध पिल्याने
बृसेलोसीस - दुधाच्या धारांमुळे
केएफडी - बंदराच्या गोचिडामुळे
लेप्टोस्पायरोसीस - लघवीपासून
टाक्‍सोप्लासमोसीस - मांजरामुळे
इबोला - व्हायरल फिव्हर
सार्स, सिटीकोसीस - पोपटामुळे
टायफॉईड - कच्चे अंडे खाल्ल्याने
क्षयरोग - थुंकीतील विषाणूंमुळे