कुणाला बसणार आरक्षणाचे धक्के?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाच्या सोडतीमुळे ग्रामीण भागातील ५० टक्के प्रस्थापितांची राजकीय कारकीर्द धोक्‍यात आल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी  प्रभागाच्या आरक्षणाचे धक्के कुणाला बसणार? हे उद्या, सात ऑक्‍टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. १५१ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेच्या नव्या ३८ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाच्या सोडतीमुळे ग्रामीण भागातील ५० टक्के प्रस्थापितांची राजकीय कारकीर्द धोक्‍यात आल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी  प्रभागाच्या आरक्षणाचे धक्के कुणाला बसणार? हे उद्या, सात ऑक्‍टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. १५१ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेच्या नव्या ३८ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ८० हजार ७५९ असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. 

या लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जातीकरिता ३० जागा आरक्षित आहेत. यातील महिलांच्या १५ जागांच्या आरक्षणासाठी उद्या सोडत काढण्यात येईल. अनुसूचित जमातीकरिता १२ जागा आरक्षित असून, यातील सहा जागा महिलांसाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात येणार आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४१ जागा आरक्षित करण्यात येणार आहे. 

प्रत्येक प्रभागात एक जागा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित करण्यात येईल. त्यामुळे ३८ प्रभागांत इतर मागासवर्गीय सदस्य निश्‍चित राहणार आहे. परंतु, उर्वरित तीन सदस्यांसाठी ज्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी आरक्षित नसेल, अशा प्रभागातून सोडत काढण्यात येईल. 

इतर मागासवर्गीयांच्या ४१ जागांतून २१ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. याशिवाय एखाद्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी किंवा दोन्हीकरिता जागा राखीव असेल; परंतु ती जागा महिलांसाठी राखीव नसेल तर अशावेळी इतर मागासवर्गीय महिलेसाठी ही जागा राखून ठेवण्यात येईल. तसेच अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलांसाठी दोन्ही जागा आरक्षित असेल तर  अशा प्रभागात इतर मागासवर्गीय जागा आरक्षित राहणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. 

नगरसेवकांची संख्या - १५१ 
प्रभाग - ३८ (४ सदस्यीय ३७, ३ सदस्यीय १) 
आरक्षण  

अनुसूचित जाती   -   ३० जागा (महिलांसाठी १५ जागा)
अनुसूचित जमाती -   १२ जागा (महिलांसाठी ०६ जागा)
ओबीसी प्रवर्ग      -   ४१ जागा (महिलांसाठी २१) 
खुला प्रवर्ग          -    ६८ जागा (महिलांसाठी ३४)

सर्वच प्रभागांत दोन महिला
महापालिकेने १५१ प्रभागांत प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित राहील. त्यानुसार ७६ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. खुल्या प्रवर्गातून ३४ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.

Web Title: zp election reservation in nagpur

टॅग्स