नेवाशात वरुणराजाच्या साक्षीने राज्यातला पहिला 'रिंगण सोहळा'  साजरा 

ringan
ringan

नेवासे : 'ज्ञानोबा माउली तुकाराम'चा गजर करीत राज्यात शिस्तप्रिय असलेल्या श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील श्री सर्मथ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पायी दिंडी पालखीचे शनिवार (ता. ७) रोजी संत ज्ञानेश्‍वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासेनगरीत दुपारी टाळ- मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी दिंडीचा राज्यातील पहिला 'रिंगण सोहळा' वरुणराजाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी पालखी दर्शन घेवून या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. ढोल, ताशे, झांज, चिपळ्यांचा नाद, माऊलीच्या जयघोषा भक्तीमय वातावरणात नेवासेनगर दुमदुमली होती. 

गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे नेवासे नगरीत आगमन होताच नेवासेकरांनी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत केले. 'रिंगण'स्थळी बसस्थानकात आगाराच्यावतीने एस. टी. अधिकारी व कर्मचार्‍यांनी तोफांची सलामी देत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी सभापती सुनीता गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, डॉ. क्षितीज घुले, नगरध्यक्षा संगीता बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, गटविकासअधिकारी सुधाकर मुंढे, नायब तहसीलदार नारायण कोरडे, ज्योतिप्रकाश जायकर, माजी आगार व्यवस्थापक सुरेश देवकर, आगार प्रमुख प्रियंका उनवणे, प्रचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्रचार्ये अरुण घनवट, रमेश सोनवणे, निवडणूक शाखेचे भाऊसाहेब मंडलिक यांनी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी तर राजेंद्र मुथ्था, रम्हू पठाण, विक्रम चौधरी, रावसाहेब कांगुणे, सुनील वाघ, राजेंद्र मापारी, अंबादास लष्करे, इम्रान दारुवाले, असिफ पठाण, दादासाहेब गंडाळ, योगेश रासने, अभय गुगळे, सुनील साळुंके, राहुल जावळे, डॉ. सचिन सांगळे, समीर पठाण, अजय पठाडे, विक्रम पवार, सागर देशमुख, सुभाष चव्हाण यांनी शहरात विविध ठिकाणी पालखी पूजन व गुरुवर्ये भास्करगिरी महाराजांचा सत्कार केला. यावेळी एस. टी. आगाराच्यावतीने तोफांची सलामी देत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.  

'ज्ञानोबा माउली तुकाराम' च्या गजरात रिंगम सोहळ्यास वरुणराजाच्या साक्षीने प्रारंभ झाला. भर पावसात वारकरी रिंगणासह झेंडेकर्‍यांचे रिंगण, टाळकर्‍यांचे रिंगण, अश्‍वांचे रिंगण सादर करण्यात आले. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नेवासे शहरासह तालुक्यातील हजारो भाविकांची मांदियाळी जमा झाली होती. यावेळी महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान दिंडीचे नेवासे शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे प्रस्थान झाले. 

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com