विश्वास नांगरे पाटील यांची पालखीमार्गावर सायकल वारी

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 19 जून 2017

सासवड (पुणे): पालखीमार्गावरील सुरक्षितता जवळून पाहता यावी यासाठी पंढरपूरपर्यंत पालखीमार्गावर सायकलद्वारे निघाल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी साडेसहाला नांगरे पाटील हडपसरहून सासवड (ता. पुरंदर) येथे पालखीतळापर्यंत सायकलने आले. त्यांच्या समवेत पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सासवडचे पोलिस उपअधीक्षक अशोक भरते, पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील आदी होते. नांगरे पाटील यांचा हा सायकल प्रवास सुमारे 218 किलोमीटरचा आहे.

पालखी बंदोबस्ताबाबत सारे नियोजन झाल्याचे अहवाल येतात. मात्र, मी अगदी बारकाईने व्यवस्था पाहतो आहे. रस्त्यालगत कुठे खड्डे आहेत, कुठे माती वा मुरमाचे ढीग पडले आहेत, काही धोकादायक ठिकाणे आहेत का, दहशतवादी कारवाई होऊ शकेल अशी ठिकाणे आहेत, हे सारे जवळून पाहता येते आहे. वारीत अडथळा नको म्हणून एक-दोन दिवस अगोदर पुढे आढावा घेत व पाहणी करीत जात आहे, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.

सासवडला पालखीतळावर व्यायाम करणाऱ्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सासवड नगरपालिकेत त्यांनी पालखी नियोजनाची बैठक घेतली. तसेच विविध सूचना करून ते सायंकाळी जेजुरीकडे रवाना झाले.