गजानन महाराज पालखीचे सोलापुरात आगमन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सोलापूर - "गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत मंगळवारी शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत झाले. सोलापुरात "सुखसमृद्धी येऊ दे, पाऊस पडू दे' असे साकडे महापौर शोभा बनशेट्टी यांनी संत गजाजन महाराजांना घातले. पालखीचे यंदा 50 वे वर्ष आहे. 

महापौर शोभा बनशेट्टी यानी सोलापूरवासीयांच्या वतीने पालखीचे स्वागत केले. पालखीचा दोन दिवस सोलापुरात मुक्काम राहणार आहे. उळे येथून सकाळी सहाच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे पाणी गिरणी चौकात आगमन झाले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंगळवारी पालखी कुचन प्रशालेत मुक्कामी असेल. बुधवारी सकाळी सात वाजता कुचन प्रशालेतून पालखी निघेल. दुपारी ती उपलप मंगल कार्यालयात मुक्कामासाठी येईल. तेथून गुरुवारी (ता.29) सकाळी पालखी निघेल. दुपारी देगाव येथे भोजन घेऊन पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे.