अभंग गाताना विठ्ठलाची अनुभूती 

अभंग गाताना विठ्ठलाची अनुभूती 

विठ्ठल नामात किती ताकद आहे. तेथे आले की मनुष्य सर्व काही विसरतो. त्याच्या अस्तित्वात एकरूप होतो. अभंगातून विठुरायाला आळविताना किती मानसिक आनंद मिळतो, याची कल्पना केवळ सांगून किंवा लिहून व्यक्त करता येणार नाही. ती प्रत्येकाने अनुभवयाची बाब आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. भजनातून अभंग गाताना मन आणि भाव एकरूप होतो. त्याचे रूपच इतके प्रभावी आहे की, कोणीही त्याच्या मोहात पडतो.

लाखो भाविक आषाढी वारीत एका मार्गाने अठरा दिवस चालत जातात. त्याच्या पायी आपली वारी समर्पित करतात. त्या देवाचे महात्म्य सांगता येणे शक्‍य नाही. विठ्ठल कोणाला कशात दिसतो, हे सांगता येत नाही. वारीत चालताना वारकऱ्यांना पावलोपावली विठ्ठलाची अनुभूती होते हे नक्की. गेली अनेक वर्ष वारी अव्याहतपणे सुरू आहे. वारीत येत असलेल्या अनुभवातून वारकऱ्यांना विठ्ठलाची प्रचिती होते. विठ्ठलाच्या अस्तित्वाची जाणीव होत असणार यात शंका नाही. विठ्ठलावर असलेल्या अतूट श्रद्धेमुळेच घरातून वीस-वीस दिवस वारकरी मंडळी वारीत सहभागी होतात आणि विठ्ठलाशी एकरूप होऊन त्यांच्यातील आनंद अनुभवतात. त्यामुळेच वारीच्या काळात प्रत्येकाला जीवनाचा विसर पडतो. हाही एक चमत्कार म्हणावा लागेल किंवा त्यांच्या नावाचे महात्म्य म्हणावे लागेल. विठ्ठलाबद्दल बोलण्याइतका मी मोठा नाही. एक पामर आहे. मी स्वतःला विठ्ठलाचा साधा भक्त समजतो. जेव्हा जेव्हा भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठलाचा अभंग गातो तेव्हा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. तर कधी कधी तो प्रेक्षकांमध्ये भरून राहिल्याची प्रचिती येते. अशावेळी मी रसिकांच्या चेहऱ्यावरील आनंदातच विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद उपभोगतो. विठ्ठलनाम घेताना माझ्या गाण्यात उतरणाऱ्या भावामुळे रसिकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या छटा ही भक्तिमय अवस्थाच विठ्ठलाचे निरनिराळी रूपे दाखवून देते. तेव्हा मनात कृतार्थची अनुभूती येऊन जाते. आपल्या गाण्यातून समोरच्या रसिकांना एकाग्र होण्याची साधना म्हणजे मला विठ्ठल दर्शनाचा अनुभवच असल्याचे मला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com