उरुळी कांचनमध्ये स्वागत

उरुळी कांचनमध्ये स्वागत

उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर येथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील भाविकांची सेवा स्वीकारत पालखी उरुळी कांचन हद्दीत आली. त्या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन, कार्याध्यक्ष महादेव कांचन, खजिनदार लक्ष्मण जगताप व गुरुदत्त भजनी मंडळाचे सुरेश कांचन यांनी पालखीचे स्वागत केले.

 पालखी माळीमळ्यातून थेऊर फाट्यावर पोचताच, थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुरेखा कुंजीर, उपसरपंच भाऊसाहेब काळे, साखर कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, हिरामण काकडे यांनी पालखीचे स्वागत केले. थेऊरफाटा परिसराच्या वतीने येथील श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, सचिन तुपे व सहकाऱ्यांनी स्वागत केले. या वेळी श्रीनाथ पतसंस्था व सचिन तुपे युवा मंचच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार वाटण्यात आला. तारमळ शाळेतील विद्यार्थ्यांनी पायी चालून वारीत सहभाग घेतला. कुंजीरवाडीत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अनुराधा कुंजीर, उपसरपंच दत्तात्रेय कुंजीर, संतोष कुंजीर यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी शिवसेनेचे हवेली विभागप्रमुख स्वप्नील कुंजीर व शाखाध्यक्ष भाऊसाहेब कुंजीर उपस्थित होते. जाणता राजा मित्रमंडळ व अष्टविनायक प्रतिष्ठानने वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप केला. 

नायगाव फाट्यावर आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायतीच्या वतीने अरविंद शिरवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोशाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, उपसरपंच मोहन जवळकर, आबासाहेब जवळकर यांनी पालखीचे स्वागत केले. पेठ फाटा येथे उद्योजक गुलाब चौधरी यांनी, तर सोरतापवाडी येथे सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच स्वाती चोरघे, राजेंद्र चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. येथे पालखी स्वागतासाठी पिंपरी येथील ज्योती कोल्हे या वारकरी महिलेने सोलापूर महामार्गावर भव्य रांगोळी काढली होती. कुंजीरवाडी आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.

कोरेगाव मूळ हद्दीत ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच विजय कानकाटे, लोकेश कानकाटे, नानासाहेब शिंदे यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी प्रयागधाम सर्वोपचार हॉस्पिटलच्या वतीने वारकऱ्यांना गोळ्या औषधांचे वाटप केले. 

चौधरी माथ्यावर जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, अशोक कसबे, दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब तुपे, दत्तात्रेय कांचन, संतोष आबासाहेब कांचन, अमित कांचन, राजेंद्र कांचन, एकनाथ चौधरी, जयप्रकाश बेदरे, शंकरराव साळुंखे यांनी पालखीचे स्वागत केले. हवेली पंचायत समितीच्या वतीने सभापती वैशाली महाडीक यांनी, तर उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अश्विनी कांचन, उपसरपंच सुनील सुभाष कांचन, सुनील कांचन, संतोष कांचन, जितेंद्र बडेकर, रोहित ननावरे, राजेंद्र जगताप, राजेंद्र कांचन, ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना पिठले भाकरीचे जेवण देण्यात आले. 

स्वामी विविकानंद प्रतिष्ठानच्या वतीने माजी अध्यक्ष सुनील शितोळे, उपाध्यक्ष सुरेश सातव, प्रकाश कांचन, संभाजी कांचन, पंडित कांचन, कमलाकर अहिनवे, साहेबराव कांचन यांनी फराळाचे वाटप केले. महात्मा गांधी तरुण मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, अखिल तळवाडी मित्रमंडळ, डॉ. मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान, गावातील पतसंस्था व सामाजिक संस्थाच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले. दुपारी तीनच्या सुमारास पालखी यवत (ता. दौंड) येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com