ज्ञान आणि भक्ती वारीचा संयोग

डॉ. अजित कुलकर्णी, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान
मंगळवार, 4 जुलै 2017

बावन्न वर्षे सलग एकादशी चुकविली नाही. माझे मूळ घर दत्त संप्रदायाचे आहे. आजोळ समर्थ संप्रदायाचे आहे. मी वारकरी संप्रदायात वाढत आहे, खरे तर हा त्रिवेणी संगमच आहे.

बावन्न वर्षे सलग एकादशी चुकविली नाही. माझे मूळ घर दत्त संप्रदायाचे आहे. आजोळ समर्थ संप्रदायाचे आहे. मी वारकरी संप्रदायात वाढत आहे, खरे तर हा त्रिवेणी संगमच आहे.

विठ्ठल हा चैतन्याचा गाभा, आनंदाचा कंद म्हणून मी पाहतो. "जैसा मनी भाव, तया तैसा अनुभव' याप्रमाणे साधकाचे अंतःकरण जोपर्यंत संवेदनशील होत नाही, तोपर्यंत ज्ञानाचे भक्तीत रूपांतर होत नाही. ज्ञान आणि भक्ती हा वारीचा संयोग आहे. वारी ही भक्तीचे सामाजिकरण आहे. परिवर्तनाचा सोहळा आहे. वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळी आवडी उतावीळ, या अभंगानुसार भगवंत पांडुरंग हा वारकऱ्यांची भेटीसाठी वाट पाहत असतो. भक्त वारकरी पांडुरंगाच्या ओढीने पुढे जात असतो. असे हे अनोखे नाते वारकरी आणि विठ्ठल यांचे आहे. हे शब्दांत दाखविता येत नाही किंवा शब्दांत व्यक्तही करता येत नाही. ते अनुभवावेच लागते. आमच्या घरात वारीची परंपरा आहे. गेली पंचवीस ते तीस वर्षे वारीत चालायची संधी मिळाली. बावन्न वर्षे सलग एकादशी चुकविली नाही. माझे मूळ घर दत्त संप्रदायाचे आहे. आजोळ समर्थ संप्रदायाचे आहे. मी वारकरी संप्रदायात वाढत आहे, खरे तर हा त्रिवेणी संगमच आहे. मला वारीतील आनंदाचे स्वरूप आहे, तोच माझ्या मनातला विठ्ठल आहे. नाव घेतल्या घेतल्या जो मनात प्रकट होतो तो विठ्ठल.
(शब्दांकन - शंकर टेमघरे)