माय फॅशन : ‘कपड्यांच्या रंगांच्या मर्यादा नकोतच’

फॅशन करताना आपोआपच काळजी घेतली जाते. कारण, घरातून बाहेर पडत असताना आईचा ‘फिल्टर’ असतो. ती खूप सल्ले देते.
Amruta Deshmukh
Amruta DeshmukhSakal
Summary

फॅशन करताना आपोआपच काळजी घेतली जाते. कारण, घरातून बाहेर पडत असताना आईचा ‘फिल्टर’ असतो. ती खूप सल्ले देते.

- अमृता देशमुख

मला कॉटनचे ड्रेसेस खूप आवडतात. त्यातही कॉटनचा फ्रॉक किंवा कॉटनचे लाँग ड्रेसेस खूप आवडतात. कारण, मी जेव्हा कधीतरी बाहेर जाते, त्यावेळी जीन्स किंवा कुठलीही ट्राउझर्स घालण्याचा मला खूप कंटाळा येतो. त्यातच आपल्या भागात वातावरण खूप उष्ण असल्यानं; तसंच भारतीय हवामानाच्या दृष्टीनं कॉटनचे कपडे खूप कंफर्टेबल वाटतात. कॉटनमधील फ्रॉक किंवा लाँग ड्रेसेस खूपच उठून दिसतात. त्याचप्रमाणे त्यांच्यावरील प्रिंटही भारतीय परंपरेला साजेशी अशी असते. ते एलिगंट वाटतात, खूप जास्त कॅज्युअलही वाटत नाही आणि खूप ओव्हर ड्रेस्डही वाटत नाही.

फॅशन करताना आपोआपच काळजी घेतली जाते. कारण, घरातून बाहेर पडत असताना आईचा ‘फिल्टर’ असतो. ती खूप सल्ले देते. तिचे सल्ले बरोबर आणि भारतीय परंपरेला धरून असतात. त्यामुळे आईनं सांगितलेले अनेक सल्ले मी फॉलो करते. मला असं वाटतं, की तुम्ही कुठल्या ड्रेसमध्ये कंफर्टेबल आहात, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठं जाता, ही गोष्टही महत्त्वाची आहे. जसं एखाद्या ठिकाणी एसी असल्यानं जास्त थंडी वाजणं किंवा दमट वातावरणामुळे खूप गरम होणं, हे प्रकार घडू शकतात. त्या दृष्टीने कपडे परिधान करावेत.

खरंतर मी फॅशनच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करत असते. मात्र, आपण ज्या शहरात आहोत, ज्या देशात आहोत, तिथल्या वातावरणानुसार कपडे घातले, तर तुम्ही जास्त कंफर्टेबल राहता. आपण जी फॅशन पाहतो, ती ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा, तुम्हाला, तुमच्या शरीरयष्टीला व रंगाला सूट होतील, असे कपडे घालावेत. कारण, वेगवेगळ्या प्रकारांतूनच आपल्याला नक्की कोणत्या प्रकारचे कपडे छान दिसतात, आपलं व्यक्तिमत्त्व, सौंदर्य कसं उठून दिसतं, हे लक्षात येतं. कपड्यांचा एखादा रंग आपल्याला चांगला दिसणार नाही, असं मनाला वाटू देऊ नका. रंगांच्या बाबतीत लिमिटेशन ठेवू नका. सर्वच रंगांचे कपडे घालत जा. कारण, कुठला रंग आपल्याला चांगला दिसेल, हे सांगता येत नाही. फक्त बाहेर खूप ऊन असेल, अन् उकडत असेल तर काळ्या रंगाचे कपडे घालायला नकोत, असं मला वाटतं.

मला फॅशनच्या बाबतीत पहिल्यापासून कतरिना कैफ खूप आवडते. कारण, ती कधीही आउट ऑफ द वे जाऊन स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करत नाही. ती वेस्टर्न आउटफिट कॅरी करते, त्यात ती कंफर्टेबल वाटते आणि उठून दिसते. त्याचप्रमाणे आलिया भट हिचेही आउटफिट खूप आवडतात. साडीत ती खूप सुंदर दिसते. भारतीय फॅशन आयकॉनमध्ये आलिया माझी फॅशन आयकॉन आहे.

फॅशन टिप्स

  • फॅशन करताना दुसऱ्याशी स्पर्धा करू नका. आपल्या शरीरयष्टीला साजेसेच कपडे घाला.

  • सध्या जे ट्रेंडिंग आहे, तो जरूर फॉलो करा, किंवा जुना एखादा ट्रेंड तुम्हाला आवडत असेल अन् त्यांचं मिश्रण करता येत असेल, तर करायला काही हरकत नाही.

  • आवडतील असेच कपडे परिधान करा. त्याबाबत स्वतःवर लिमिटेशन घालून घेऊ नये. लोक काय म्हणतील, या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं.

  • एखादा प्रसंग किंवा कार्यक्रम कसला आहे, याचा विचार मात्र कपडे परिधान करताना करावा. भारतात कपड्यांचे खूप प्रकार आहेत, त्यांचाही विचार करावा.

  • कोणतेही ट्रेंड्स डोळे झाकून फॉलो करू नका.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com