Women Day : महिलांच्या सुरक्षेसाठीचे 5 अ‍ॅप्स, इंटरनेटशिवाय वापरता येणार

आजकालच्या महिला जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करताहेत,
mobile
mobileesakal
Summary

आजकालच्या महिला जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करताहेत.

आजकालच्या महिला जवळपास प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करताहेत, पण सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र त्या इथे मागेच राहतात. महिलांसाठी आवश्यक अधिकारांमध्ये सुरक्षित वातावरणाचा समावेश केला पाहिजे. आणि बदलत्या काळाने आणि गरजांनीही या दिशेने काम केले आहे, आज असे अनेक मोबाइल अॅप आले आहेत, ज्याच्या मदतीने त्यांना संकटकाळात मदत मिळू शकते. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल.

mobile
जागतिक महिला दिन : सहा जणींची कहाणी पिढ्यान्‌पिढ्यांची

Safetipin-

महिलांच्या सुरक्षेसाठी हे अ‍ॅप जीपीएस ट्रॅकिंग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग अशा अत्यावश्यक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. नकाशाच्या आधारे, हे अॅप यूजरच्या सभोवतालची सुरक्षित जागा पिन करते, उदा., जी जागा सुरक्षित नाही ती जागा लाल रंगात दाखविली जाते, जी जागा पूर्णपणे सुरक्षित असते ती हिरवी असते आणि तपकिरी-पिवळा रंग असलेली ठिकाणे कमी सुरक्षित या कॅटेगिरीमध्ये येतात. जेणेकरून महिलांना अलर्ट राहतील. एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे यूजर इतरांना मदत करण्यासाठी असुरक्षित ठिकाणे देखील पिन करू शकतो.

Himmat-

हे अॅप दिल्ली पोलिसांनी लाँच केले आहे. त्यामुळे त्याचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम दिल्ली पोलिसांच्या वेबसाइटवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल. नोंदणीच्या प्रक्रियेत एक ओटीपी येईल, जो मोबाइलमध्ये टाकताच सुरू होईल. संकटाच्या वेळी युजर या अॅपच्या माध्यमातून एसओएस मेसेज पाठवू शकतो. जेणेकरून त्याचं लोकेशन आणि ऑडिओ-व्हिडिओ थेट दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचेल आणि पोलीस तातडीनं मदतीसाठी पोहोचतील.

mobile
Women's Day: कॅप्टन आईने महिला दिनी मुलीला दिले 'आदर्श' गिफ्ट

Raksha-

या अॅपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इंटरनेट नसतानाही त्याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले बटन दाबून यूजर आपले अलिकडील लोकेशन आधीच निवडलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर पाठवू शकतो. अॅप बंद असले तरी त्याचे बटन 3 सेकंद दाबून आवश्यक त्या लोकांना अलर्ट मेसेज पाठवता येईल.

Smart24*7-

भारतातील अनेक राज्यांचे पोलीस या अॅपच्या माध्यमातून महिला आणि वृद्धांना मदत करत आहेत. याचे पॅनिक बटण दाबत हे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर अलर्ट मेसेज पाठवण्याचे काम करते, तसेच आवाज रेकॉर्ड करून आणि फोटो काढून स्थानिक पोलिसांना पाठवते. या अॅपमध्ये कॉल सेंटर सपोर्टचीही सुविधा आहे.

Shake2Safety-

हे अॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे. अडचणीच्या वेळी, फक्त आपला मोबाइल फोन शेक करा किंवा पॉवर बटण 4 वेळा दाबा. हे करताच मेसेज किंवा कॉल्स एकाच वेळी आधीच रजिस्टर केलेल्या नंबरवर जातील. इंटरनेट असो वा नसो, फोन लॉक झाला की नाही, तरीही हे अॅप चालेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com