माय फॅशन : ‘मूडनुसार रंगांची निवड करा’

माझा फॅशन फंडा म्हणजे, मी जे कपडे घालते, ते माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुली किंवा मला भेटणाऱ्या मुली यांना मोटीवेट करणारं असलं पाहिजे.
Namrata Gaikwad
Namrata GaikwadSakal
Summary

माझा फॅशन फंडा म्हणजे, मी जे कपडे घालते, ते माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुली किंवा मला भेटणाऱ्या मुली यांना मोटीवेट करणारं असलं पाहिजे.

मला इंडो वेस्टर्न कपडे खूप आवडतात. कारण, त्यासाठी वेगळी क्रिएटिव्हिटी लागते. स्टाइल ही वैयक्तिक असते, तिचा फॅशनशी काहीही संबंध नसतो. फॅशन ही सतत बदलत असते, अन् स्टाइल ही कायमस्वरूपी लक्षात राहणारी असते. म्हणून मला असं वाटतं, की फॅशन करताना तुम्ही स्टाइल कशा पद्धतीनं डेव्हलप करता, काय स्टाइलनं तुम्ही कपडे घालून फॅशनेबल राहता, हे महत्त्वाचं आहे. काय ट्रेंडमध्ये आहे आणि काय ट्रेंडमध्ये नाहीये, याचा विचार करण्यापेक्षा स्टायलिंगचा विचार करावा. 

माझा फॅशन फंडा म्हणजे, मी जे कपडे घालते, ते माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुली किंवा मला भेटणाऱ्या मुली यांना मोटीवेट करणारं असलं पाहिजे. ते आत्मविश्वास देणार असलं पाहिजे. म्हणूनच मी असे कपडे घालते, जे इतर मुलींना छान वाटतील, त्यांना माझ्यामुळे प्रेरणा मिळेल. त्यासाठी मला अगोदर ते छान आहे, हे ॲक्सेप्ट करून कॅरी करावे लागतात. माझ्या फॅशन सेन्स किंवा ड्रेसिंग सेन्सवरून माझ्या आजूबाजूच्या इतर मुलींना प्रेरणा मिळणार आहे का, याचाही मला विचार करावा लागतो. रंगांची निवड करताना खूप काळजी घ्यावी लागते. एकूणच तुमच्या मूडनुसार कपड्यांचे रंग निवडावेत. तुम्हाला अपसेट वाटत असेल, तर तुम्ही हलके-फुलके ब्राइट, व्हायब्रंट रंगांचे कपडे घालावेत. त्यामुळे तुमचा मूड छान होईल आणि तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल. मूड बदलण्यासाठी रंग हे नेहमीच मदत करत असतात.

आपल्याला कोणते रंग आवडतात, हे आपल्याला माहीत असतं अन् त्यानुसार रंगांची निवड करून तसे कपडे घातले, तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात. अशाच पद्धतीनं मी माझ्या आवडीच्या रंगांचेच कपडे घालते. मला कंगना राणावत, जेनिफर लोपेझची फॅशन खूप आवडते. दोघीही माझ्या फॅशन आयकॉन आहेत. कंगना बोल्ड आहे. तिच्या विचारांतूनही ती बोल्ड आहे. तिच्या कपड्यांमधूनही ते झळकतं. तसंच जेनिफरचंही आहे. तिचं वय जितकं आहे, ती तितकी अजिबात वाटत नाही. तिची स्टाइल, अॅटिट्यूड खूप छान आहे.

मला मुलींना सांगावंसं वाटतं की, तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे की, ड्रेसिंग सेन्स हा तुमचा ॲटिट्यूड, कम्फर्टनेस आणि आत्मविश्वास खुलवतो.

फॅशन टिप्स

  • तुम्हाला योग्य वाटतात, तेच कपडे नेहमी घाला.

  • जे कपडे आवडतात, ते कॅरी करायला शिका. म्हणजे जे कपडे घालाल त्यात कम्फर्ट असले पाहिजे.

  • तुम्ही खूप प्रसिद्ध व्यक्ती आहात, असं समजून कपडे परिधान करा. त्यामुळे तुमचा फॅशन सेन्स, स्टायलिंग दिसून येते.

  • स्वतःला नेहमी दाद द्या. कारण, आपल्याला आपल्या स्वतःलाच ड्रेसिंग आवडलं, तर ते बाहेरच्यांना हमखास आवडतं.

  • कपडे साधे असले, तरी त्यांच्यावर अॅक्सेसरीज, ट्रेंडी सँडल, फूटवेअर असले तर त्यात जास्त गंमत येते आणि आपण आकर्षक दिसतो.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com