कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला काद्यांने केले मालामाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

सध्या कांद्याचे भाव आकाशाला भिडत असल्याने सर्वंसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असतानाच, एका शेतकऱ्याला मात्र कांद्याने करोडपती केले आहे.

चित्रदुर्ग : सध्या कांद्याचे भाव आकाशाला भिडत असल्याने सर्वंसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असतानाच, एका शेतकऱ्याला मात्र कांद्याने चांगलेच मालामाल केले आहे. कर्ज घेऊन कांद्यांची शेती केलेल्या या शेतकऱ्याने जवळपास 240 टन कांद्याचे पिक घेतले आहे. त्यामुळे यंदा कांद्याचा बाजारभाव किलोमागे जवळपास दोनशे रुपयेपर्यंत पोचल्याने हा शेतकरी करोडपती झाला आहे. 

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील डोड्डासिद्वावनहल्ली गावातील रहिवाशी असणाऱ्या मल्लिकार्जुन (वय 42) यांना ही काद्यांची बंपर लॅाटरी लागली आहे. मल्लिकार्जुन यांनी 15 लाखांचे कर्ज घेऊन जेव्हा कांद्याची लागवड केली होती तेव्हा त्यांनी जवळपास 5 ते 10 लाखांचा नफा होऊल असा विचार केला होता, मात्र कांद्याच्या वाढलेल्या भावांनी त्यांना थेट करोडपतीच बनवला आहे. मल्लिकार्जुन हे या नफ्यांतून आणखी शेतजमीन विकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले असून तसेच ते एक सुंदर घर देखील बनवणार आहेत. 

आता इतरांना ही शिकवतात शेती

मल्लिकार्जु हे 2004 पासून कांद्यांची शेती करत असल्याने ते आता यात चांगलेच पटाईत झाले असून यंदाच्या त्यांचा या य़शाने आजूबाजूच्या गावातील शेतकरी ही प्रभावित झाले असून ते सर्व मल्लिकार्जुन यांच्याकडे शेतीच्या टिप्स घेण्यासाठी येत आहेत.
 

आतापर्यंत शेतीत घेतलेल्या सर्व जोखीमांपैकी ही माझी सर्वांत मोठी जोखीम होती, मी कर्ज घेऊन कांद्याची लागवड केली होती. त्यामुळे जर माझे हे पिक खराब झाले असते तर मी मोठ्या अडचणीत सापडलो असतो.
- मल्लिकार्जुन, कांदा उत्पादक शेतकरी.

 

web title : farmer got millions with onion farming


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer got millions with onion farming