कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान झेपावले आकाशात

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

औरंगाबाद - सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी शुक्रवारी (ता.नऊ) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रज्ञ सोबत असलेले विमान आकाशात झेपावले. हे विमान मराठवाड्याच्या कुठल्या भागात गेले, तसेच ढगांवर मेघबीजारोपन झाले का, याबद्दलची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. 

 

औरंगाबाद - सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी शुक्रवारी (ता.9) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रज्ञ सोबत असलेले विमान आकाशात झेपावले. हे विमान मराठवाड्याच्या कुठल्या भागात गेले, तसेच ढगांवर मेघबीजारोपन झाले का, याबद्दलची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. 

गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला यंदाही पावसाने सुरवातीपासून हुलकावणी दिली. त्यामुळे यंदा कृत्रिम पाऊस पाडण्याचे महसूल विभागाने जाहीर केले होते. या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर रविवारपासून (ता.4) डॉपलर रडार बसविण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, गुरुवारी (ता.आठ) रडारची यंत्रणा कार्यान्वीत झाल्यानंतर शुक्रवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाले. विमानतळावर शास्त्रज्ञ आणि वैमानिकांचे महसूल उपायुक्‍ती सतीश खडके, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत निंबाळकर यांनी स्वागत केले.

विभागीय आयुक्‍तालयातील डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या कंट्रोलरूमकडून वैमानिकास आणि शास्त्रज्ञांना इमेजेस पाठविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी एक वाजता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी विमानाने आकाशात झेप घेतली.

हे विमान औरंगाबाद शहराच्या पश्‍चिम भागात गेले असून 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या ढगांवर मेघबीजारोपन करणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले. हा प्रयोग यशस्वी झाला का, या प्रयोगाच्या माध्यमातून नेमका किती पाऊस पाडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aircraft leaped into the sky to try artificial rain In Aurangabad

फोटो गॅलरी