घनकचऱ्यापासून हेवाळे येथे सेंद्रिय खताची निर्मिती

प्रभाकर धुरी
सोमवार, 5 मार्च 2018

दोडामार्ग - हेवाळे गावाने सेंद्रिय खत निर्मिती अभियान हाती घेत गाव कचरामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. सरपंच संदीप देसाई यांच्या पुढाकाराने गावात तीन सेंद्रिय काजू शेती गट स्थापन केले असून सुमारे 105 शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातून गांडूळ निर्मिती युनिट बांधून देण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात 70 शेतकरी कुटुंब यात सहभागी झाले आहेत. शनिवारी (ता. 3) हेवाळे ग्राम मध्ये प्रत्यक्ष सेंद्रिय खत निर्मितीला प्रारंभ झाला आहे. गेल्या अडीच वर्षात कित्येक अभियान आणि उपक्रम राबवून आज ग्रामविकासाचे मॉडेल बनू पाहणाऱ्या हेवाळे गावाने तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने घनकचरा व्यवस्थापन करताना सेंद्रिय खत निर्मितीचा मोठा प्रकल्प हेवाळे वासीयांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

गावात एक कुटुंब 40 दिवसात सरासरी 600 किलो सेंद्रिय खत निर्मिती करू लागला तर 105 कुटुंबे 40 दिवसात सुमारे 60 हजार किलोहून अधिक उत्पादन घेऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय खत निर्माण करताना  घराच्या सभोवताली दैनंदिन साचणारा ओला व सुका असा संपूर्ण कुजणारा कचरा घरच्या घरी विलेव्हाट लावली जाणार आहे.

-  संदीप देसाई, सरपंच

गावातील एकूण 137 पैकी 105 शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या या सेंद्रिय खत निर्मिती युनिट पैकी 70 शेतकऱ्यांनी युनिट बांधणी पूर्ण केली आहे. या युनिटपासून आता प्रत्येक कुटुंब 40 दिवसात 600 ते 1000 किलो इतके सेंद्रिय खत उत्पादन घेणार आहे. त्यामुळे सलग दोन वर्षे स्वच्छ ग्राम पुरस्कार विजेत्या हेवाळे गावच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Organic fertilizer preparation program Hevale