डाळी घसरल्या; गहू, ज्वारी महाग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

सांगली : नोटाबंदीनंतर ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याचे अनुभव व्यापारी सांगत आहेत. त्याचा परिणाम धान्य बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

एकीकडे स्थानिक शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात मोठ्या प्रमाणात आला असताना उठावच नसल्याने दर गडगडले आहेत. डाळींच्या दरात सुमारे 30 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली आहे. तुलनेत गहू आणि ज्वारीचे दर 3 ते 5 रुपयांनी वाढले आहेत. 

सरकारपुढे सहा महिन्यांपूर्वी डाळींचे दर भडकण्याची समस्या होती. त्याबद्दल प्रचंड नाराजी, टीका सहन करावी लागली होती. आता नोटाबंदीनंतर परिस्थिती बदलली आहे. डाळी घसरल्या असल्या तरी बाजारात उठाव नाही, ही स्थिती आहे. मूगडाळ 110 रुपये किलोवरून 75 ते 80 रुपयांवर आली आहे. मसूरडाळ 100 रुपयांवरून 75 ते 80 रुपये झाली आहे. तूर डाळ 120 रुपयांवरून 100 रुपये झाली आहे. उडीद डाळीचा दर 160 रुपयांवरून 110 रुपयांवर आला आहे. शेंगदाणा दर 20 रुपयांनी घसरून 80 रुपये झाले आहे. दुसरीकडे गव्हाच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे. 27 रुपयांचा गहू 30 रुपये किलो झाला आहे. ज्वारी दरात 5 रुपयांची वाढ होऊन 25 ते 30 रुपये झाली आहे. 

बाजार समिती ठप्प 
दरम्यान, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात थंडावली आहे. आर्थिक व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत जातील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गूळ रवे, गूळ भेली, हरभरा, उडीद, ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन इतक्‍याच शेतमालाची आवक आहे. तीदेखील अत्यंत कमी. 

फळांची आवक 
विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये फळांची उलाढाल हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आज 3 हजार क्विंटल कांदा आवक झाली. दर 200 ते 1200 रुपये राहिला. 1416 क्विंटल बटाटा आवक झाली असून दर 400 ते 1500 रुपये राहिला. लसूण आवक 48 क्विंटल असून 5 हजार ते 10 हजार दर राहिला. मोसंबी, संत्री, डाळिंब, चिक्कू, सीताफळ, पर्प, कलिंगड, अननस, सफरचंद आणि बोराची आवक सुरू आहे.

Web Title: Demonetisation effect on Pulses and market