समाजाचा उत्कर्ष साधण्याचा हेतू- प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नागपूर : ‘राज्याच्या विकासातील विविध उपक्रमांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून सहभागी होत समाजाचा उत्कर्ष साधण्याचा सकाळ माध्यम समूहाचा हेतू आहे,’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे केले. 

नागपूर : ‘राज्याच्या विकासातील विविध उपक्रमांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून सहभागी होत समाजाचा उत्कर्ष साधण्याचा सकाळ माध्यम समूहाचा हेतू आहे,’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे केले. 

 सकाळ-अॅग्रोवन सरपंच महापरिषदेेस रविवारी (ता. २५) प्रारंभ झाला. या वेळी उद्‌घाटन सत्रात श्री. पवार बोलत होते. कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या प्रबोधन व प्रशिक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करताना श्री. पवार म्हणाले, की ‘राज्याच्या विकासातील विविध उपक्रमांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून सहभागी होत समाजाचा उत्कर्ष साधण्याचा सकाळ माध्यम समूहाचा हेतू आहे. यासाठी विविध उपक्रमांमधून आम्ही बारा महिने चोवीस तास गुंतवून घेतलेले आहेत. तनिष्काच्या माध्यमातून महिलांसाठी, अॅग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, तसेच ‘यिन’च्या माध्यमातून युवकांसाठी उपक्रम राबविले जात आहेत. तनिष्का स्मार्ट व्हिलेजसाठी इस्राईलच्या माध्यमातून आम्ही राज्याचा ग्रामविकास व शेतीत परिवर्तन घडवून आणणारा प्रयोग राबवत आहोत.’ 

‘शेती हा व्यवसाय आहे. त्यासाठी संशोधन, प्रशिक्षण, खर्चाचे नियोजन या मुद्यांकडे लक्ष द्यावेच लागेल. मात्र चार पैसे जादा मिळू लागले तर उडवू नका. मी राजस्थानात होतो. मारवाडी मासणाला मी जवळून पाहिले आहे. तो कमविलेल्या पैशांची कधीही उधळपट्टी करत नाही. त्यामुळे सरपंचांनी हीच भूमिका ठेवून गाव, शेती, शिवाराच्या प्रगतीसाठी पुढे आले पाहिजे. आम्ही देत असलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण सर्वांगीण प्रगती साधावी, हीच सकाळ माध्यम समूहाची इच्छा आहे,’ असेही प्रतापराव पवार यांनी नमूद केले. 

Web Title: cause of welfare of society, pratap pawar