काचुरवाहीत हळदीची शेतीशाळा

अतुल मेहेरे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नागपूर - शासनाच्या ‘परसबाग फुलविणे’ या उपक्रमांतर्गत रामटेक तालुक्‍यातील काचुरवाही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करतानाच हळदीची शेतीशाळा केली. या प्रयोगातून सहा ते आठ किलो हळदीचे उत्पन्न काढले. नावीन्यपूर्ण प्रयोगातून येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना एक नवीन वाट दाखविली.

हळदीची लागवड करण्यासाठी शिक्षकांनी सहा महिन्यांपूर्वी ओलसर राहणाऱ्या जागेची निवड केली. विद्यार्थ्यांच्या हाताने हळदीचे दोन-तीन कंद दोन बाय चार फूट जागेत (कॅरी) लावले. नियमित पाणी देण्यासोबतच शाळेच्या आवारातील इतर झाडांच्या पालापाचोळ्याचे खत दोन-तीन वेळा घातले. शिकण्यासोबतच हळद पिकविण्याचा नादच जणू विद्यार्थ्यांना लागला. पीक दिसू लागताच ते अधिक काळजी घेऊ लागले. आज सहा महिन्यांनंतर पीक हाती आले, तेव्हा विद्यार्थ्यांच्या आनंदास पारावार उरला नाही. हा आनंद त्यांनी आज आपल्या गुरुजनांसह साजरा केला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या प्रयोगातून शेतकऱ्यांसमोर चांगला आदर्श ठेवला. नियमित पिकांसोबतच शेतकऱ्यांनी योग्य जागेची निवड करून अशा पिकांचे प्रयोग केल्यास उत्पन्नात वाढ होण्यासाठी निश्‍चितच मदत होईल. याशिवाय शाळेच्या परसबागेत ज्वारी, टमाटे, शेंगा, पोपट-चवळीच्या शेंगा, गिलक्‍याची वेल (चोपडे दोडके) हीसुद्धा पिके सद्य:स्थितीत आहेत. ज्वारीची कणसे चांगली डोलू लागली आहेत. टमाटे, शेंगा, दोडके विद्यार्थ्यांना रोज पोषण आहारात दिले जातात, अशी माहिती शिक्षिका हर्षा वैद्य यांनी दिली. 

शाळेच्या मुख्याध्यापिका दुर्गा इडपाची, शिक्षक भारत गजभिये, रेखा बागडे, ललिता सोमकुंवर, धनराज थोटे, दिनेश पाचपुते, पंजाब राठोड, पोषण आहार शिजविणाऱ्या नंदा आणि सविता बावणे यांचेही परसबाग फुलविण्यात मोठे  योगदान आहे.

Web Title: Turmeric farming